Next
‘नदी प्रदूषण कमी करण्यासाठी नवीन तंत्राचा वापर आवश्यक’
डॉ. नितीन करमाळकर यांचे मत
BOI
Tuesday, August 20, 2019 | 02:24 PM
15 0 0
Share this article:

राष्ट्रीय सेवा योजनेच्या  कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. नितीन करमाळकर

पुणे : ‘नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी नवीन तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. यासाठी ‘स्पोंज’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त आहे. युवाशक्ती या कामात इतिहास घडवू शकते,’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकाऱ्यांची वार्षिक नियोजन कार्यशाळा लोणावळा येथे आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. 


‘पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या कार्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान महत्त्वाचे आहे. पंढरपूर वारीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे,’ असेही कुलगुरुंनी नमूद केले. 

राष्ट्रीय सेवा योजनेच्या  कार्यशाळेत सहभागी झालेले  कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यासह डॉ. नितीन करमाळकर व अन्य मान्यवर.

पुणे शहर व ग्रामीण भागातील महाविद्यालयांमधील सुमारे २५० कार्यक्रमाधिकारी, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे,  प्रा. डॉ. संजय चाकणे, डॉ. विलास उगले, बागेश्री मंठाळकर, डॉ. मोहन वामन, डॉ. नितीन घोरपडे, पुण्यातील सिंहगड संकुलाचे संचालक प्रकाश पाटील, सिंहगड संकुल लोणावळाचे संचालक डॉ. माणिक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या ‘रासेयो’ स्वयंसेवकांचा गौरव करण्यात आला. हरित वारी अभियानाची गिनिज बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल ‘रासेयो’च्या कार्यक्रम अधिकाऱ्यांचा कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search