Next
आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीपसाठी ‘होंडा’चे नवे संघ
प्रेस रिलीज
Thursday, August 09, 2018 | 03:48 PM
15 0 0
Share this article:

होंडा एनएसएफ २५० आरचेन्नई : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया प्रा. लि. गेल्या दशकभरापासून भारतातील रेसिंग क्षेत्रात कार्यरत आहे. ७५० ग्रँड प्रिक्स विजयांसह ‘होंडा’ मोटरस्पोर्ट्समध्ये जागतिक आघाडीवर आहे. याच यशाची आशिया आणि ओशनियामध्ये पुनरावृत्ती करण्यासाठी भारतासह सर्व प्रांतातील सर्व होंडा ग्रुप ऑफ कंपनीजने आंतरराष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशीपमध्ये उतरण्यासाठी आशियाई रायडर्ससाठी तीन नवे संघ तयार केले आहेत.

त्यातील होंडा आशिया ड्रीम रेसिंग ऐतिहासिक सुझुका एट अवर्स एंड्युरन्स रेस आणि जेएसबी वन थाउसंड क्लास ऑफ ऑल जपान रेस चॅम्पियनशीप या जपानमधील सर्वात उच्चभ्रू रो रेसिंग चॅम्पियनशीपमध्ये स्पर्धा करणार आहे. दुसरा संघ ‘इडीमित्सू मोटोटू’मध्ये आशियाई रायडर्ससाठी व्यासपीठ असेल आणि होंडा टीम एशिया मोटोथ्री क्लास ऑफ एफआयएण रोड रेसिंग चॅम्पियनशीपमध्ये उतरेल. हे दोन क्लासेस मोटोजीपी या सर्किट रेसिंग क्षेत्रातील उच्चभ्रू क्लासकडे नेणाऱ्या पायऱ्या आहेत. या संघांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा रायडर असावा, असे होंडा टूव्हीलर्स इंडियाचे स्वप्न आहे.

याबाबत ‘होंडा’चे अध्यक्ष आणि सीईओ मिनोरू काटो म्हणाले, ‘ग्रँड प्रिक्स दर्जाच्या रेसिंग भारतीयाने पूर्ण करणे हे माझे स्वप्न आहे. म्हणून रायडर्सचा विकास करण्यासाठी व स्पर्धेसाठी आखणी करण्यासाठी आम्ही भारतीय मोटरस्पोर्ट्स पुढील पातळीवर नेण्याचे ठरवले आहे. ‘होंडा’ पुढील वर्षी मोटोथ्री मशिन एनएसएफ २५० आर स्पर्धात्मक बाइक म्हणून उतरवणार आहे. होंडा इंडिया टॅलेंट कप आणि राष्ट्रीय चॅम्पियनशीपमधील भारतातील सर्वोत्तम रेसर ‘एनएसएफ २५० आर’मध्ये सध्याच्या राष्ट्रीय चॅम्पियनशीपला समांतर, स्वतंत्र मालिकेत धावणार आहेत. मोटोस्पोर्ट्सला भारतात उज्ज्वल भविष्य आहे आणि रेसिंग क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘होंडा’ अशाप्रकारे प्रयत्न करत राहील.’

‘एनएसएफ २५० आर’ दर्जेदार कामगिरी आणि रायडरस्नेही वैशिष्ट्यांमुळे जगभरात उदयोन्मुख रेसर्ससाठी सर्वोत्तम मोटारसायकल म्हणून नावाजली जात आहे. बऱ्याच वर्षांचे संशोधन आणि विकासानंतर होंडा रेसिंग कॉर्पोरेशने तयार केलेली ही बाइक तरुण रायडर्सना आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचण्यास मदत करते. आटोपशीर, कमी वजनाची, उत्तम कामगिरी करणारी ही मोटारसायकल तरुण गुणवत्तेला प्राथमिक फेरीसाठी मूलभूत कौशल्ये शिकवण्यापासून आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स रेसिंगपर्यंतचा प्रवास करण्यासाठी मदत करेल.

‘एनएसएफ २५० आर’बाबत बोलताना ‘होंडा’चे ब्रँड आणि कम्युनिकेशन्सचे उपाध्यक्ष प्रभू नागराज म्हणाले, ‘नवा मापदंड प्रस्थापित करणाऱ्या प्रचंड यशस्वी झालेल्या ‘एनएसएफ २५० आर’ने भारतीय मोटरस्पोर्ट्समध्ये नवा अध्याय सुरू केला आहे. उदयोन्मुख चॅम्पियन्ससाठी जगभरात पुढच्या पातळीवर नेण्यासाठी प्रसिद्ध असलेली ‘एनएसएफ २५० आर’ भारतीय रायडर्ससाठीही महत्त्वाची पायरी ठरेल. विशिष्ट कारणाने बनवण्यात आलेल्या रेसिंग मोटारसायकल रायडिंगचा अनुभव त्यांना स्पर्धेत पुढे राहाण्यासाठी आणि करियरच्या प्राथमिक टप्प्यावर आंतरराष्ट्रीय रेसिंगचा दर्जा राखण्यासाठी मदत करेल.’

‘एनएसएफ २५० आर’ ही २४९ सीसी इंजिन अस्टिटेड बाय रॅम एयर इन्टेक सिस्टीम मोटारसायकला अतिशय गरम वातावरणातही चांगली ताकद मिळवून देते. ‘एनएसएफ २५० आर’मध्ये गुरुत्वाकर्षणाचा बिंदू खाली असून, त्याला योग्य लवचिकतेसाठी स्विंग्रामची जोड देण्यात आल्यामुळे मोटारसायकलची हाताळणी क्षमता जास्त नेमकी होते.

होंडा टू व्हीलर्स इंडियाने २००८मध्ये होंडा वन मेक रेस सीरीजसह मोटरसायकल रेसिंगला सुरुवात केली. दरवर्षी सीरीजनुसार विकसित होणाऱ्या ‘होंडा’ने भारतीयांना रेसिंग सहजपणे उपलब्ध करण्यात मोठा वाटा उचलला आहे. रेसर्सना ‘सीबीआर १५० आर’ आणि ‘सीबीआर २५० आर’ अशा काही जागतिक दर्जाच्या रेसिंग मशिन्स उपलब्ध झाल्या आहेत.

तरुण रेसर्सचा विकास करत होंडा टू व्हीलर्स इंडियाने मे २०१८मध्ये होंडा इंडिया टॅलेंट हंट कार्यक्रमास सुरुवात केली. होंडाच्या ‘कॅच देम यंग’ या उक्तीनुसार उदयोन्मुख रेसर्सना प्रोत्साहन देण्यासाठी टॅलेंट हंट तयार करण्यात आला. निवडक रेसर्ना होंडाच्या रेसिंग अॅकॅडमीमध्ये भारताच्या सर्वोत्तम रायडर्सबरोबर स्पर्धा करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. निवडक रायडर्स होंडा इंडिया टॅलेंट कप– सीबीआर १५० आर क्लासमध्ये स्पर्धा करतात. जून २०१८मध्ये झालेल्या पहिल्या फेरीत चेन्नईतील १४ वर्षांचा मुलगा एमडी. मुकाईल याने १७ सेकंदांच्या आघाडीसह रेस जिंकली. टॅलेंट कपमध्ये अनुभवी रायडर्ससाठी ‘सीबीआर २५० आर क्लास’चाही समावेश होतो.

भारतीय नॅशनल मोटारसायकल रेसिंग चॅम्पियनशीपमध्ये होंडा रायडर्स राजीव सेथु आणि अनिश सेथु प्रो स्टॉक ६५ आणि सुपरस्पोर्ट १६५ क्लास या दोन्ही स्पर्धांमध्ये गुणपत्रिकेत आघाडीवर आहेत. यावर्षी ‘होंडा’ने आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भारतीयांच्या पहिल्या टीमसह इतिहास घडवला. भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजीव आणि अनीशने आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये आश्वासक प्रगती दर्शवली आहे. तरुण भारतीय रेसर्स राजीव सेथु आणि सेंथिल कुमार यांना थाई टॅलेंट कपमध्ये अतिरिक्त आंतरराष्ट्रीय रेसिंग अनुभव मिळत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search