Next
उद्धव ज. शेळके
BOI
Sunday, October 08 | 04:00 AM
15 0 0
Share this story

वैदर्भीय ग्रामीण जीवनाचं आणि विविध जातिधर्मांतल्या स्त्रियांचं प्रत्ययकारी चित्रण आपल्या कथा-कादंबऱ्यामधून करणारे उद्धव शेळके यांचा आठ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मधून त्यांचा थोडक्यात परिचय...
.........

उद्धव ज. शेळके 
आठ ऑक्टोबर १९३१ रोजी हिंगणघाटमध्ये जन्मलेले उद्धव शेळके हे समर्थ कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ग्रामीण आणि विशेषतः उपेक्षितांचं विश्व त्यांनी आपल्या प्रत्ययकारी लेखनातून उभं केलं आहे. 

१९६० सालच्या त्यांच्या ‘धग’ या पहिल्याच कादंबरीनें त्यांना अफाट प्रसिद्धी मिळवून दिली. ‘मैलाचा दगड’सारख्या विशेषणांनी त्या कादंबरीचं कौतुक झालं. राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. त्यांच्या बहुसंख्य कादंबऱ्यांमधून त्यांनी प्रामुख्याने विविध जातीधर्मांतल्या स्त्रियांचं चित्रण केलं आहे. 

त्यांनी ‘वैशिष्ट्य’ नावाचं मासिक चालवून पाहिलं; पण पुरेशा आर्थिक पाठबळाअभावी ते बंद करावं लागलं होतं. १९७१ सालापासून पुढे पाच वर्षं त्यांनी पाठ्यपुस्तक मंडळाच्या ‘किशोर’ या लोकप्रिय मासिकाचं संपादन केलं होतं.

धुंदी, पुरुष, नर्तकीचा नाद, महामार्ग, निर्माता, बाईविना बुवाधग, शिळान, गर्विता, खंजिरीचे बोल, मनःपूत, नांदतं घर, कोवळीक, पूर्ती, डाळिंबाचे दाणे अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

तीन एप्रिल १९९२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link