Next
‘कॉमिओ स्मार्टफोन’तर्फे ‘कॉमिओ सी१ प्रो’ सादर
प्रेस रिलीज
Monday, June 18, 2018 | 03:59 PM
15 0 0
Share this story

मुंबई : कॉमिओ स्मार्टफोन्स या भारतातील मध्यम श्रेणीतील उभरत्या ब्रँडने ‘कॉमिओ सी१ प्रो’ हा आणखी एक लक्षवेधी स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून कॉमिओ आपल्या ग्राहकांना फेस अनलॉक, आठ मेगापिक्सल कॅमेरा आणि ड्युएल व्हीओएलटीई-व्हीआयएलटीई, इंट्रू्यडर सेल्फी, व्हीनस ब्राउझर, प्रादेशिक भाषांची सुविधा, फाँट अॅप्लिकेशन आणि बाइक मोड अशी विविध वैशिष्ट्ये उपलब्ध करून देत आहे.

पाच हजार ५९९ रुपये किंमत असलेला ‘सी१ प्रो’ फोन मेटालिक ग्रे, सनराइज गोल्ड आणि रॉयल ब्लॅक अशा तीन प्रकारांत उपलब्ध आहे.

‘कॉमिओ सी१ प्रो’मध्ये ४जी ड्युएल व्हीओएलटीई-व्हीआयएलटीई सपोर्ट असून, त्याला मीडियाटेक ६,७३९ क्वाड कोअर प्रोसेसरची शक्ती बहाल करण्यात आलेली आहे. अधिक चांगल्या अनुभूतीसाठी यामध्ये मल्टीपल फाँट सपोर्टही देण्यात आला आहे. ५.० इंच एचडी डिस्प्ले, क्वाड कोअर ६४ बीट प्रोसेसर, १.५ जीबी रॅम आणि रॉम १६ जीबीची मेमरी अशी वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. दोन हजार ५०० एमएएच शक्तीची बॅटरी असलेल्या या फोनमध्ये मुख्य कॅमेरा ८.० मेगापिक्सल क्षमतेचा असून, सेल्फी कॅमेरा पाच मेगापिक्सलचा आहे.

या फोनला सीमकार्डसाठी दोन आणि एसडी कार्डसाठी एक असे तीन खास स्लॉट्स देण्यात आले आहे. एसडी कार्डची क्षमता १२८ जीबीपर्यंत विस्तारित करता येऊ शकते; तसेच पीपीटी, वर्ड, एक्सेल, पीडीएफ यांच्यासाठी या फोनमध्ये डब्लूपीएस ऑफिस सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ‘कॉमिओ सी१ प्रो’मध्ये अँड्रॉईड ८.१ (ओरिओ) ऑपरेटिंग सिस्टीम बसविण्यात आली असून, त्यामुळे अत्यंत मुलायम अशा पॉप टच, वापरण्यास अतिशय सुलभ यूआय आणि दुपटीने जलद कार्यक्षमता असे लाभ मिळतात.

या निमित्ताने बोलताना कॉमिओ स्मार्टफोन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक संजय कुमार कलीरोना म्हणाले, ‘अत्यंत कमी कालावधीमध्ये ‘कॉमिओ सी१ प्रो’ हा आमचा आणखी एक स्मार्टफोन बाजारात सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या किंमत श्रेणीतील ग्राहकांना देखील अधिकाधिक चांगली आणि आधुनिक वैशिष्ट्ये असणारा फोन मिळणे हा त्यांचा हक्कच आहे. ‘कॉमिओ सी१ प्रो’ स्मार्टफोन किफायतशीर असून, उत्कृष्ट दर्जाचा कॅमेरा, अधिक चांगला वेग, सुरक्षा प्रणाली, आकर्षक डिझाईन आणि मूल्यवर्धित सेवा यांनी परिपूर्ण आहे.’

कॉमिओ स्मार्टफोन वापरकर्ते आता अमर्याद डेटा आणि टॉक टाइमचा आनंद लुटू शकतात. जिओ ग्राहकांना १९८ आणि २९९ प्रतीमहिन्याच्या योजनेच्या पहिल्या रिचार्जसोबत दोन हजार २०० रुपयांचा रोख परतावा (५० रुपये किंमतीची ४४ व्हाउचर्स) मिळणार असून, दुसऱ्या रिचार्जपासून हवे तेव्हा ही योजना रिडीम करता येईल.

‘कॉमिओ सी१ प्रो’ संपूर्ण भारतभर मोबाइल दुकानात उपलब्ध असेल; तसेच स्नॅपडील, फ्लिपकार्ट, अमेझॉन, शॉपक्लूज आणि पेटीएम येथे ऑनलाइन देखील खरेदी करता येईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link