Next
होप फाउंडेशनतर्फे ‘आव्हानात्मक वाटा’ कार्यक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, March 20 | 06:21 PM
15 0 0
Share this story

पुणे :  होप फाउंडेशनच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयस्क्वेअरआयटी) संस्थेच्यावतीने वेगळ्या वाटा निवडलेल्या महिलांच्या  अनुभवकथनाचा  ‘आव्हानात्मक वाटा’ हा कार्यक्रम शनिवारी, २४ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवारी, सकाळी अकरा  वाजता हिंजवडी येथील संस्थेच्या मोहिनी छाब्रिया कॉन्व्हेंशन सेंटरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध लेखिका कविता काणे, मुख्य वक्ता म्हणून सीएनबीसीच्या निवेदिका आणि सहयोगी संपादक सुरभी उपाध्याय उपस्थित राहणार आहेत. संस्थेची विद्यार्थिनी आणि आंतरराष्ट्रीय कराटेपटू शिवानी राजहंसी या वेळी तिच्या कराटेच्या प्रवासाविषयी बोलणार आहे.

‘आव्हानात्मक वाटा’ यावर परिसंवाद होणार असून, त्यामध्ये शेल्टर्स असोसिएट्च्या कार्यकारी संचालिका प्रतिमा जोशी, नॅसकॉम फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक चैत्रा नेरुरकर, औंध लाईटहाऊसच्या केंद्रप्रमुख अमृता बहुलेकर आणि हायवेज इन्फनाईटच्या संचालिका डॉ. रितू बियाणी सहभागी होणार आहेत. ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या अध्यक्षा डॉ. उमा गणेश या परिसंवादाचे सूत्रसंचालन  करणार आहेत. ‘या कार्यक्रमातून वेगळ्या वाटा निवडलेल्या महिलांच्या धाडसाचे अनुभवकथन ऐकण्याची आणि यातून नवीन मार्ग निवडण्याची संधी महिलांना मिळणार आहे,’ असे होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link