Next
अनोखा ‘अरण्यबंध’
BOI
Monday, December 17, 2018 | 05:17 PM
15 0 0
Share this article:

चित्रपटांची आवड जोपासण्याच्या निमित्तानं बंगाली कादंबऱ्यांकडे वळलेल्या ठाण्यातील अर्चना पटवर्धन यांना ज्येष्ठ बंगाली लेखक बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘आरण्यक’ या पुस्तकाने भुरळ पाडली. हे पुस्तक त्यांनी मराठीत अनुवादित करून ‘अरण्यबंध’ नावाने ‘ई-बुक’ स्वरूपात वाचकांसमोर आणलं. बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या ‘ई-बुक’चा हा परिचय...
..........................
अरण्य म्हटलं, की डोक्यात येतो तो रामायण-महाभारताचा काळ. त्यानंतर आपण गृहीत धरतो ते वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी, शिकारी आणि फार झालं तर वन्यजीव फोटोग्राफी करणारे छायाचित्रकार. तुमच्या आमच्यासारखा शहरी-पांढरपेशा माणूस फारसा अरण्याच्या वाटेला न जाणारा; पण अशाच अरण्याच्या वाटेवरून चाललेल्या आणि सहा वर्षांचा प्रदीर्घ अरण्यवास अनुभवलेल्या एका नायकाची कहाणी या पुस्तकातून मांडण्यात आली आहे. प्रसिद्ध बंगाली लेखक बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या तेवढ्याच प्रसिद्ध ‘आरण्यक’ या बंगाली पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे ‘अरण्यबंध.’ ठाण्याच्या अर्चना बळवंत पटवर्धन यांनी हे पुस्तक अनुवादित केलं आहे. लेखकानं चाकरीच्या निमित्तानं झालेल्या पाच-सहा वर्षांच्या दीर्घ अरण्यवासातील अनुभव आणि कल्पना यांचा सुंदर गोफ विणून लिहिलेलं हे पुस्तक आहे. 

या पुस्तकातील नायक सत्यचरण, सुशिक्षित, सुसंकृत, पांढरपेशा घरातला, नैतिक मूल्यं जपणारा असल्याने, आपली नाळ त्याच्याशी सहजच जुळते. पुस्तकाचा कालखंड जवळपास १०० वर्षांपूर्वीचा असला आणि त्यातील चाली-रीती, संकल्पना जरी कालबाह्य वाटल्या, तरी माणसा-माणसांतली नाती, आपुलकी, प्रेम, विश्वास आणि विशेषतः निसर्गाशी असलेलं अनोखं नातं हे चिरंतन प्रेरणा देणारं आहे. 

कोलकात्यासारख्या महानगरात वाढलेला सत्यचरण एका जमीनदाराच्या जंगल महालात नोकरीसाठी रुजू होतो. तिथे आल्यावर आल्या पावली परत जाण्याचा विचार करणं, तिथे राहिलेल्या काळात अरण्याच्या प्रेमात पडणं या सगळ्या परिवर्तनाचा आलेख मांडण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. या सगळ्या काळात सत्यचरणला भेटलेली वेगवेगळी माणसं, आजूबाजूचा निसर्ग यांचं वर्णनही यात सापडतं. 

माणसा-माणसांतील प्रेम, आपुलकी, विश्वास आणि माणूस व निसर्गाचं नातं अधोरेखित करणारं हे पुस्तक आहे. हा अनुवाद म्हणजे निव्वळ भाषांतर नसून मूळ भाषेचा गोडवा कायम ठेवून मराठी भाषेचा बाजही सांभाळलेला आहे. अनेक तपशील आणि बारकावे समजून घेऊन केलेलं हे लेखन अतिशय अभ्यासपूर्ण आहे. कथानकातील ओघ कायम राखण्यात लेखिकेला यश आलं आहे. एका निराळ्याच वाचनाचा अनुभव देणारं असं हे पुस्तक आहे. 

मूळ पुस्तक : आरण्यक (बंगाली)
मूळ लेखक : बिभूतीभूषण बंदोपाध्याय
अनुवादित ई-बुक : अरण्यबंध (मराठी) 
मराठी अनुवाद : अर्चना बळवंत पटवर्धन, ठाणे
ई-बुक प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
किंमत :  २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
balkrishna gramopadhye About 110 Days ago
hope , she translates more of his books .
0
0

Select Language
Share Link
 
Search