Next
नाट्य, नृत्यकलेचा बालरंगोत्सव
प्रेस रिलीज
Saturday, February 10 | 03:13 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘आकांक्षा बालरंगभूमी’ आयोजित दुसऱ्या बालरंगोत्सवाचे आयोजन २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. बालरंगोत्सवात ‘ड्रामेबाज’ व ‘सुपर डान्सर’ या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील कलाकारांचा स्नेहमेळावा बालरंगोत्सवाचा एक भाग आहे. त्याचबरोबर बालकलाकार व सिनेनाट्य क्षेत्रातल्या मान्यवरांचे चर्चा व परिसंवाद आणि बालनाट्य पुस्तक प्रकाशन असे भरगच्च कार्यक्रम या बालरंगोत्सवात असणार आहेत. आकांक्षा बालरंगभूमी अंगणमंच, वनदेवी मंदिर परिसर कर्वेनगर येथे हा बालरंगोत्सव रंगणार आहे.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य एकपात्री अभिनय स्पर्धेची (ड्रामेबाज) प्राथमिक फेरी १७ फेब्रुवारी रोजी, तर अंतिम फेरी २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ड्रामेबाज स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत तसेच चार गटात होणार आहे. 

एकल नृत्य स्पर्धा सुपर डान्सरची प्राथमिक फेरी १८ फेब्रुवारी रोजी, तर अंतिम फेरी २५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती आकांक्षा बालरंगभूमीचे सागर लोधी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

बालरंगोत्सवाविषयी :
दिनांक : २४ व २५ फेब्रुवारी २०१८
ठिकाण : आकांक्षा बालरंगभूमी अंगणमंच, वनदेवी मंदिर परिसर, कर्वेनगर, पुणे

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link