Next
डॉ. बोर्डे, डॉ. परिहार यांना पशुसंवर्धन पुरस्कार जाहीर
BOI
Friday, May 25 | 05:15 PM
15 0 0
Share this story

डॉ. दिनकर बोर्डेसोलापूर : पंढरपूर येथील पशुसंवर्धन तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. दिनकर बोर्डे व कराड पशुसंवर्धन तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अंकुश परिहार यांना केंद्र सरकारचा सर्वोत्कृष्ट क्षेत्रीय पशुवैद्यक पुरस्कार २३ मे रोजी जाहीर झाला.

पंढरपूर येथील पशुसंवर्धन तालुका लघु पशुवैद्वियकिय सर्व चिकित्सालयात डॉ. परिहार यांनी सहाय्यक आयुक्त म्हणून सहा वर्षे सेवा केली आहे. आत्ता ते याच पदावर कराड येथील तालुका लघु पशुवैद्वियकिय सर्व चिकित्सालयात कार्यरत आहेत. कराड येथेच सहा वर्षे सेवा केलेले डॉ. बोर्डे आता पंढरपूर येथे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. डॉ. बोर्डे व डॉ. परिहार हे दोघे शालेय जीवनापासूनच एकमेकांना परिचित आहेत. पशुवैद्यकीय क्षेत्रात त्यांना नोकरी लागली तेव्हापासून त्यांची मैत्री अगदी घट्ट बनली आहे. घोड्यांची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणून या दोघांचीही महाराष्ट्राला ओळख आहे.

डॉ. अंकुश परिहारआता या दोघांनाही पशुवैद्यक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट क्षेत्रीय पशुवैद्यक म्हणून केंद्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहेत. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून या दोघा मित्रांचीच निवड झाल्यामुळे या दोघांनाही त्याचा आनंद आहे. डॉ. परिहार यांना प्रथम, तर डॉ. बोर्डे यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. येत्या एक जूनला दिल्ली येथील कै. आण्णासाहेब शिंदे कृषी भवनमध्ये केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

आत्तापर्यंत चांगले काम केल्याची पावती या पुरस्कारामुळे मिळाल्याची प्रतिक्रिया डॉ. बोर्डे यांनी व्यक्त केली, तर डॉ. परिहार यांनी आम्हा दोघा मित्रांना हे पुरस्कार जाहीर झाल्याने खूप आनंद झाल्याचे सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amol Popatrao Suryawanshi About 235 Days ago
Congratulation sir
1
0
Dr G M Kulkarni About 236 Days ago
Both beloved friends got Best Field veterinarian award at single time is really a quiet nice moment and I proud it Once again Hearty Congratulations Of both friends
1
0
शांती सारंग , औरंगाबाद About 236 Days ago
छान बातमी
2
0

Select Language
Share Link