Next
प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या ‘जल की बातें’ उपक्रमाला सुरुवात
BOI
Tuesday, September 10, 2019 | 01:01 PM
15 0 0
Share this article:


पुणे : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या वतीने पाण्याचे महत्त्व सांगणाऱ्या ‘जल की बातें’ या उपक्रमाला सोमवारपासून (नऊ सप्टेंबर) पुण्यात सुरुवात झाली. सहकारनगर येथील पंडित भीमसेन जोशी कलादालनात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक भूपेंद्र कॅन्थोला यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोचे संचालक संतोष अजमेरा, सहाय्यक संचालक भरत देवमणी आणि ‘सेव्ह वॉटर हिरो अॅवॉर्ड’ विजेते मकरंद टिल्लू उपस्थित होते.

‘जल की बातें’ उपक्रमाचे उद्घाटन ‘एफटीआयआय’चे संचालक भूपेंद्र कॅन्थोला यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोचे संचालक संतोष अजमेरा, सहाय्यक संचालक भरत  देवमणी आदी उपस्थित होते.

मकरंद मसराम आणि ममता मसराम यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली; तसेच ब्युरोच्या कलाकारांनी पाणी या विषयावर गीते सादर केली.
‘भारत सरकारने सुरू केलेल्या हा उपक्रमाचे स्वच्छ भारत अभियानासारख्या मोठ्या चळवळीत रूपांतर झालं पाहिजे, तसेच या मोहिमेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन भूपेंद्र कॅन्थोला यांनी या वेळी केले.

संतोष अजमेरा म्हणाले, ‘जल की बातें’ ही भारत सरकारने सुरू केलेली लोकचळवळ आहे. ‘जनशक्ती से जलशक्ती’ ही या मोहिमेची संकल्पना आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात ‘जल की बातें’ हा पाणी बचतीचा संदेश देणारा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे.’


या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्र रंगवा स्पर्धा, जल प्रबोधन वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन स्पर्धा आणि जलरंग रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिवसभरात सुमारे तीन हजार जणांनी या उपक्रमाला भेट दिली. यात ‘जलदर्शन’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, हे प्रदर्शन बुधवार, ११ सप्टेंबरपर्यंत सकाळी नऊ ते सहापर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search