Next
व्हायोलिनच्या सुरांनी श्रोते मंत्रमुग्ध
पं. कशाळकर यांना वत्सलाताई भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान
BOI
Friday, December 14, 2018 | 10:32 PM
15 0 0
Share this story

पं. उल्हास कशाळकर

पुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची संध्याकाळ मिलिंद रायकर आणि यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने सुरेल झाली,तर ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या सुमधुर गायनाने या संगीत मैफलीस सोन्याचा कळस चढवला.

पं. उल्हास कशाळकर यांना वत्सलाताई भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. या वेळी उपेंद्र भट, पं. तळवलकर, श्रीनिवास जोशी, आनंद भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी पं. उल्हास कशाळकर यांना आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्यासह मंडळाच्या विश्वस्तांच्या हस्ते वत्सलाताई भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. रुपये ५१ हजार, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘एका महान गायकाच्या कुटुंबीयांनी केलेल्या या सन्मानाचे माझ्यासाठी विशेष मोल आहे. पं. भीमसेन जोशी आणि वत्सलाताई जेव्हा आमच्या घरी येत तेव्हा मनावर थोडेसे दडपण येई. परंतु वत्सलाताई सर्वांशी इतक्या आपलेपणाने बोलत की ते दडपण निघून जात असे. त्या उत्तम गायिका होत्या’, अशा शब्दात कशाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंडळाचे विश्वस्त आनंद भाटे, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, मिलिंद देशपांडे, उपेंद्र भट या वेळी उपस्थित होते.

व्हायोलिन वादक मिलिंद रायकर आणि यज्ञेश रायकर

प्रसिद्ध व्हायोलिन वादक मिलिंद रायकर आणि यज्ञेश रायकर या पितापुत्रांच्या अद्वितीय व्हायोलिन वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, त्यांनी राग ‘भूप’ने आपल्या वादनास सुरुवात केली आणि राग ‘हमीर’मधील एक रचनाही त्यांनी सादर केली. ‘बाजे रे मुरलिया बाजे’ या लोकप्रिय भजनाने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांच्या या सहवादनास श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. रायकर पितापुत्रांना पं. विश्वनाथ शिरोडकर (तबला), यश भावसार (स्वरमंडळ), स्वप्नील कुलकर्णी व दिगंबर शेडुळे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.  


पं. उल्हास कशाळकर यांनी राग ‘बसंत बहार’सादर केला. त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर (तबला), सुधीर नायक (हार्मोनियम), निर्भय सक्सेना व अलिकसेन गुप्ता (तानपुरा) यांनी साथसंगत केली.    

(मिलिंद व यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अनुराधा यादवाडकर About 98 Days ago
खुप छान लिहिलंय...यंदा गंधर्व महोत्सवाची जागा बदलल्याने जाता आले नाही पण ब्लॉग मुले प्रोग्राम कळला. तुला यात इंटरेस्ट असेल तर माझ्याकडे अगदी पहिल्या वर्षांपासून ची नोंद मिळेल.
0
0

Select Language
Share Link