Next
पुण्यातील महिलांसाठी ‘मेलोरा’चे फॅशनेबल दागिने
प्रेस रिलीज
Wednesday, January 23, 2019 | 04:47 PM
15 0 0
Share this article:

पुणे : यंदाच्या व्हॅलेंटाइन दिनासाठी ‘मेलोरा’ या आघाडीच्या डिझाइन कंपनीने उत्कृष्ट असे हृदयाचे आकाराचे डिझाइन तयार केले आहेत. व्हॅलेंटाइन डेच्या अनुषंगाने कंपनीने आधुनिक ‘ट्रेंडी हार्ट’ कलेक्शन पुण्यात दाखल केले आहे.

हे संपूर्ण कलेक्शन गोल्ड आणि डायमंड ज्वेलरीमध्ये असून, त्यावर ऑटम/विंटर २०१८-१९मधील नवीन शैलीचा प्रभाव आहे. यात हृदय हे केंद्रस्थानी असून, दागिन्यांच्या डिझाइनमधून अनेक ट्रेंड समोर येतात. त्यांत डिस्को सीक्वीन्स, नाइफ प्लीटस, स्कार्फ प्रिंट, फ्लावर बुके, ॲनिमल प्रिंट, बोज आणि नीऑन यांचा समावेश आहे.

या वेळी बोलताना ‘मेलोरा’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापिका सरोजा येरामिल्ली म्हणाल्या, ‘या दिवशी यथायोग्य अशी भेटवस्तू त्यांच्या प्रिय व्यक्तीला देऊ इच्छिणाऱ्या पुरुषांसाठी व्हॅलेंटाइन कलेक्शन आदर्शवत व व्यक्तिकेंद्री आहे. असे असले, तरी हे कलेक्शन पाश्चिमात्य कपड्यांची आवड असणाऱ्या आणि ज्यांना स्वतःसाठी काही वेगळे खरेदी करायचे आहे, अशा महिलांसाठीही परिपूर्ण असेल. १२०प्रकारच्या या दागिन्यांचे कलेक्शन हे प्रेम आणि फॅशनमधील प्रत्येक गोष्ट अधोरेखित करतात. ‘मेलोरा’ची नवीन व्हॅलेंटाइन गोल्ड आणि डायमंड दागिने हे परवडण्याजोगे, फॅशनेबल आणि दैनंदिन वापरासाठी परिपूर्ण असे आहेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search