Next
‘डिझाइन डेक्को’तर्फे पुण्यात आयोजित ‘कनेक्शन्स’ला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Saturday, June 01, 2019 | 11:03 AM
15 0 0
Share this article:


पुणे : नाविन्यपूर्ण पद्धतीने सजवण्यात येणाऱ्या जागा व त्यामागील कल्पक व सर्जनशील व्यक्ती यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘कनेक्शन्स बाय डिझाइन डेक्को’ या एकदिवसीय कार्यक्रमात आघाडीचे आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स व घरगुती सजावटीत तज्ज्ञ असे अनेक नामवंत आवर्जून उपस्थित होते. पुण्यातील केशवनगर येथील गोदरेज रेजुवे येथे हा कार्यक्रम झाला.

डिझाइन डेक्को हा गोदरेज समूहाने स्थापन केलेला मंच असून, इंटिरियर डिझाइन व्यावसायिकांनी एकत्र येऊन आपले नेटवर्क वाढवावे, मित्रमंडळी, ब्रँड्स व ग्राहक यांच्यासोबत संबंध प्रस्थापित व विकसित करावेत हा यामागचा उद्देश आहे. फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विटर यांसारख्या डिजिटल व सोशल मीडियावर डिझाइन डेक्को सक्रिय आहे. सध्याचे व संभाव्य घरमालक, सजावटीची आवड असणाऱ्या व्यक्तींपासून ते आर्किटेक्चर व इंटिरियर डिझाइन क्षेत्रातील नामवंतांपर्यंत विविध व्यक्तींचा समावेश असलेले ‘कनेक्शन्स बाय डेक्को’ संवाद व विचारांच्या देवाणघेवाणीतून सर्व संबंधितांसाठी आगळावेगळा अनुभव निर्माण करते.


तंत्रज्ञानामुळे भविष्यातील घरांवर कशाप्रकारे प्रभाव पडत आहे याच्याशी निगडित एक्सपीरियन्स झोन्स, मास्टरक्लासेस व परिसंवादांचा ‘कनेक्शन्स बाय डिझाइन डेक्को’मध्ये समावेश होता. सहभागी झालेल्या विविध ब्रॅंड्ससोबत संलग्न उपक्रम व सहयोग संधींमार्फत आर्किटेक्ट्स व इंटिरियर डिझायनर्सना यामध्ये सामावून घेण्यात आले होते. गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स व गोदरेज लॉक्स यांच्या सिक्युरिटी झोनमध्ये जागतिक दर्जाची सुरक्षा उत्पादने प्रदर्शित करण्यात आली होती. 

गोदरेज प्रॉपर्टीजने इझी बिगिनिंग्स हा आपला उपक्रम या ठिकाणी सादर केला. यात संभाव्य घरमालक व अॅक्सिस बँक व होम कॅपिटल यांच्यासारखे आर्थिक सहयोगी यांना एकत्र आणून स्वतःच्या मालकीचे घर खरेदी करण्याचे स्वप्न अधिक सोपे, सहज करण्याचा हा उपक्रम आहे.  युअँडअस झोनमध्ये घरमालकांना इंटिरियर डिझायनर्सकडून मोफत सल्ला मिळवण्याची संधी मिळाली.

स्टुडिओ कोर्सचे आर्किटेक्ट कल्पक शाह यांनी घरामध्ये स्टाईल व सौंदर्य यांचा अनोखा मिलाप कसा साधता येईल याच्या साध्यासोप्या टिप्स या वेळी सांगितल्या. तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले घर स्मार्ट आणि सुरक्षित कसे बनवता येईल याबद्दलची उपयुक्त माहिती देण्यात आली. या विशेष कार्यक्रमात अनेक नामवंतांनी आपले विचार मांडले. सारा शाम (एस्साजीस ऍटेलिर), रिचा बहल (रिचा बहल डिझाइन स्टुडिओ) व निशिता कामदार (स्टुडिओ निशिता कामदार) यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीवरील रंगांचा प्रवास उलगडून सांगितला. ख्यातनाम आर्किटेक्ट व अर्बानिस्ट माधव रमण (अनाग्राम आर्किटेक्टस) यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा डिझाइन क्षेत्रावरील प्रभाव या विषयावर विचारप्रवृत्त करणारे व्याख्यान दिले. चित्रकार व शिल्पकार केतकी पिंपळखरे आणि मायक्रो स्कल्प्टर यश सोनी (पेन्सिल कार्विंग्स) यांनी आपल्या कारकिर्दीतील अनुभव सांगून कला हे त्यांच्यासाठी विचार व्यक्त करण्याचे माध्यम कशा प्रकारे आहे ते समजावून सांगितले.


या उपक्रमाबद्दल बोलताना गोदरेज ग्रुपचे व्हाइस प्रेसिडेंट व हेड कॉर्पोरेट ब्रँड अँड कम्युनिकेशन्स सुजित पाटील म्हणाले, ‘सहभाग व समन्वयाला प्रोत्साहन देणारे मंच निर्माण करण्यात गोदरेज समूहाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ‘कनेक्शन्स बाय डिझाइन डेक्को’ या आमच्या पहिल्या कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद नक्कीच आनंददायी व उत्साहवर्धक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आम्ही डिझाइन डेक्कोची सुरुवात केली. आर्किटेक्टस, इंटिरियर डिझायनर्स व सहयोगी क्षेत्रांमधून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या पॉप-अप्सच्या सीरिजमधून आम्ही डिझाइनमध्ये विशेष आवड असणारे व या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या विचारांच्या देवाणघेवाणीसाठी एक मंच उपलब्ध करून देत आहोत. या वैचारिक संमेलनामुळे या उद्योगक्षेत्रात नवनवीन संकल्पना आणल्या जाव्यात असा आमचा उद्देश आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search