Next
वीणा गवाणकर, रॅन्डॉल जरेल
BOI
Sunday, May 06, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘सद्भावना वाढवणारी आणि कटू प्रसंगांना तोंड कसं द्यायचं हे शिकवणारी पुस्तकं,’ असं डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ज्यांच्या पुस्तकांचं वर्णन केलं होतं, त्या लेखिका वीणा गवाणकर आणि कविता, समीक्षा सांभाळून कथा-कादंबऱ्या आणि बालसाहित्य लिहिणारा रॅन्डॉल जरेल यांचा सहा मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....
वीणा चंद्रकांत गवाणकर
 
सहा मे १९४३ रोजी जन्मलेल्या वीणा चंद्रकांत गवाणकर या उत्कृष्ट चरित्रकार म्हणून ओळखल्या जातात. स्वतः ग्रंथपाल असणाऱ्या गवाणकर यांनी लिहिलेली अनेक नावाजलेल्या व्यक्तींची चरित्रं लोकप्रिय झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘एक होता कार्व्हर’ या अफाट गाजलेल्या चरित्राने त्या मराठी माणसांच्या घराघरात पोहोचल्या. त्या पुस्तकाची मोहिनी विलक्षण आहे. 

सुप्रसिद्ध लेखक आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी गवाणकर यांच्या पुस्तकांचं वर्णन ‘सद्भावना वाढवणारी आणि कटू प्रसंगांना तोंड कसं द्यायचं हे शिकवणारी पुस्तकं’ असं केलं होतं. 

एक होता कार्व्हर, आयुष्याचा सांगाती...इंटिमेट डेथ, डॉ. आयडा स्कडर, सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स, शाश्वती, भगीरथाचे वारस, डॉ. खानखोजे - नाही चिरा...., डॉ. सालीम अली, लीझ माइटनर, रॉबी डिसिल्व्हा, रोझलिंड फ्रॅन्क्लीन, अशी त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत.

(वीणा गवाणकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
........

रॅन्डॉल जरेल 

सहा मे १९१४ रोजी टेनेसीमध्ये जन्मलेला रॅन्डॉल जरेल हा अमेरिकेन कवी, रोखठोक समीक्षक, कादंबरीकार, निबंधकार आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची समीक्षा अत्यंत थेट आणि स्पष्ट असल्यामुळे बऱ्याचदा कडक भाषेत असायची. कवींवर त्याच्या समीक्षेचा दरारा असायचा.

आयुष्याच्या महत्त्वाच्या काळात त्याने कविता लिहिल्या आणि समीक्षेवर भर दिला; पण आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने बच्चेकंपनीसाठी लिहिलेली दी बॅट पोएट, दी अॅनिमल फॅमिली, दी जिंजररब्रेड रॅबिट यांसारखी  पुस्तकं आणि ग्रीम ब्रदर्सच्या परीकथांचे त्याने केलेले अनुवाद प्रचंड गाजले होते. 

१४ ऑक्टोबर १९६ रोजी चॅपेल हिलमध्ये त्याचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link