Next
‘दुष्काळाबाबत तत्काळ निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्या’
शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
प्रेस रिलीज
Monday, November 19, 2018 | 02:00 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा आणि वेळीच पावले उचलून जनतेला दिलासा द्यावा,’ अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून, त्यासोबत दुष्काळी संकटाशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही पाठवली आहे.

‘महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पर्जन्यमान कमी झाल्याने ऐन हिवाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळाचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. विशेषत: परतीच्या पावसाने निराशा केल्याने खरीपाचे पीक हातचे गेले असून, रब्बी पिकांची पेरणी संकटात आली आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यांच्या टंचाईमुळे पशुधनही धोक्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने यावर कृती कार्यक्रम हाती घ्यावा,’ अशी मागणी पवार यांनी या पत्राद्वारे केली आहे.

दुष्काळावर मात करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची टिप्पणीही या सोबत पवार यांनी जोडली असून, मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 62 Days ago
Time to start schemes for facing the possibilty of famine next year . Such schemes take time for planning . Hence the need for making an early start .
0
0

Select Language
Share Link
 
Search