Next
‘स्वेरी’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नऊ डिसेंबरला पुण्यात
BOI
Thursday, December 06, 2018 | 01:57 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘ऋणानुबंध २०१८’ या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मेळाव्याचे आयोजन या वर्षी पुण्यातील कोथरूड येथे करण्यात आले आहे. हा मेळावा नऊ डिसेंबरला होईल,’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.

या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांसाठी चर्चा, सुसंवाद, नव्या विचारांबरोबरच जुन्या आठवणींच्या शिदोरीची देवाणघेवाण, काम करत असलेल्या ठिकाणी आलेले अनुभव कथन असे अनेक भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. महाविद्यालयातर्फे माजी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात येईल. ‘लवाल इंडिया’ कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट-एचआर विनोद बिडवाईक हे या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून अल्फा उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत; तसेच संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे, ट्रेनिंग अॅंड प्लेसमेंट अधिष्ठाता व माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. माधव राऊळ, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

मेळाव्यादरम्यान जुन्या आठवणींना उजाळा देऊन गतकाळात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे १९९८पासून ते गत वर्षीपर्यंत उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. ‘स्वेरी’मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबई, बेंगळुरूसह अन्य प्रमुख शहरांमध्ये व परदेशात स्थायिक झालेले माजी विद्यार्थीदेखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

अधिकाधिक विद्यार्थी हे पुण्यात स्थायिक झाले असून, अनेकांना कामाच्या व्यापामुळे पंढरपुरात येणे शक्य होणार नसल्याने हा मेळावा कोथरूड येथे आयोजित केल्याचे डॉ. राऊळ यांनी सांगितले. 

मेळाव्याविषयी : 
दिवस : रविवार, नऊ डिसेंबर २०१८ 
स्थळ : पुण्याई सभागृह, पौड रोड, कोथरूड, पुणे.
अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. माधव राऊळ- ९५४५५ ५३८८१.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link