मुंबई : ‘लेक्सस इंडिया’ने आपल्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त ‘एनएक्स ३०० एच’ ही आधुनिक हायब्रिड इलेक्ट्रिक एसयूव्ही कार भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे.
याबाबत लेक्सस इंडियाचे अध्यक्ष पी. बी. वेणुगोपाल म्हणाले, ‘आमच्या गाड्यांमध्ये जी कलाकुसर सादर केली जाते. त्यातून लेक्ससमधील आमचा मनुष्यकेंद्री किंवा ग्राहककेंद्री दृष्टिकोन दिसून येतो. दुसऱ्या वर्षात पदार्पण करताना ग्राहकांच्या सेवेचे नवनवे मार्ग शोधण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ‘एक्स्पीरियन्स अमेझिंग’ हे आमचे वचन सातत्याने पाळून ग्राहकांना संतुष्ट करणे हेच आमचे ध्येय म्हणजे ‘ओमोतेनाशी’ – म्हणजेच लेक्सस ब्रँडचा पाया आहे. लेक्ससच्या खास थाटात ‘एनएक्स ३००एच’ भारतभरातल्या ग्राहकांच्या सुपूर्द केली जात आहे. पूर्ण भरलेल्या इंधनासह गाडी ग्राहकांच्या हवाली केली जाते आणि त्यांच्याच हस्ते गाडी तिचे मैल मोजायला सुरुवात करते. त्याशिवाय हा सोहळा प्रत्येक ग्राहकाच्या आवडीनिवडींचा आणि सवडीचा विचार करून आखला जातो. मैसूरमधील एका ग्राहकाच्या कुटुंबातील प्रत्येकाला आगळीवेगळी गिफ्ट्स देऊन त्या सगळ्यांना लेक्ससच्या लाईफस्टाईलचा अनुभव देण्यात आला. मुंबईतील एका ग्राहकासाठी त्याच्या लेक्ससबरोबर एक असे खास गिफ्ट त्याच्या आवडीनुसार तयार करून दिले गेले, जे त्याला त्याच्या संग्रही कायम ठेवता येईल. ग्राहकांशी सौहार्दपूर्ण संबंध जोडण्याचे प्रशिक्षण लेक्सस त्यांच्या ग्राहकसेवा अधिकाऱ्यांना देतात. कक्षात पहिले पाऊल ठेवण्यापासून ते गाडी त्यांच्या त्यांच्या ताब्यात देण्यापर्यंत आणि त्यानंतरही आवश्यक सेवा पुरवण्यापर्यंत सगळ्या सेवा हे अधिकारी ग्राहकांना देतात.’
लेक्सस इंडियाचे एन.राजा म्हणाले, ‘फक्त एका वर्षात आम्ही लक्षणीय प्रगती केली आहे आणि आम्हाला मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही खूप उत्साहित आहोत. लेक्सस ब्रँड जास्तीत जास्त लोकप्रिय करणे आणि हायब्रीड गाड्यांवर लक्ष केंद्रित करणे हे आमचे आगामी वर्षांमधील ध्येय असेल. जास्त प्रसार, उच्च दर्जाची उत्पादने आणि ‘लेक्सस डिझाईन अवॉर्ड इंडिया’ सारख्या उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपणे या त्रिसूत्रीद्वारे आम्हाला आमचे भविष्यातले स्थान बळकट करायचे आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘मार्च २०१७ मध्ये लेक्ससने ‘इएस३००एच’, ‘आरएकस ४५०एच’ आणि ‘एलएक्स४५०डी’ या मॉडेल्सबरोबर भारतात पदार्पण केले. पहिल्या वर्षातच आम्ही चार ग्राहककक्ष उघडले. त्यानंतर लगेचच ‘एनएक्स३००एच’चे पदार्पण झाले. येत्या वर्षात ब्रँडचे भारतातील अस्तित्व आणखी बळकट करण्याचा आमचा मानस आहे. वाहनक्षेत्रातील वाढत्या आव्हानांना प्रतिसाद म्हणून जास्त ताकदवान आणि प्रतिष्ठेची अशी नवी मॉडेल्सही लेक्सस घेऊन येणार आहे. ‘लेक्सस डिझाईन अवॉर्ड इंडिया’च्या दुसऱ्या पर्वाद्वारे सामाजिक बांधिलकी जपणे आणि पर्यावरणवादी कल्पक योजना राबवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.’