Next
हिमायतनगर शहरात बैलपोळा उत्साहात
BOI
Tuesday, September 11, 2018 | 11:23 AM
15 0 0
Share this article:

बैलपोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेले नागरिक.

हिमायतनगर : शहरात दर वर्षीप्रमाणे याही वर्षी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष कुणाल राठोड आणि उपनगराध्यक्ष म. जावेद भाई यांच्या उपस्थितीत हिमायतनगर नगरपंचायतीच्या मानाच्या बैल जोडीची परमेश्वर मंदिर ते बाजार चौक येथील हनुमान मंदिर अशी वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या प्रसंगी जेष्ठ नागरिक लक्ष्मन शकरगे, प्रथम नगराध्यक्ष अ. अखिल, अनवर खान पठाण, राम भाऊ ठाकरे, प्रभाकर अण्णा मुधोळकर, ज्ञानेश्वर शिंदे, समद खान, सरदार खान पठाण, सदाशिव सातव, सावन डाके, विनायक मेंडके, फेरोज खान, आहाद भाई, विठ्ठल ठाकरे, गजानन चायल, संतोष गाजेवार, पंकज बंडेवार, गजानन मानगुळकर, विशाल राठोड, विजय नरवाडे, संजय माने, रामभाऊ सूर्यवंशी, मंगेश धुमाळे, शेख सलीम शेवालकर, गजानन मानगुळकर, दीपक कात्रे, साईनाथ कोमवार, बंडूभाऊ अंनगुलवार, निक्कू ठाकूर, पांडू अप्पा तुप्तेवार, हनुसिंग ठाकुर यांच्यासह शहरातील व्यापारी, पत्रकार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिमायतनगर नगरपंचायतीच्या मानाच्या बैल जोडीची पूजा करताना नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपनगराध्यक्ष म. जावेद भाई.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search