Next
अरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात
संत सावता महाराज समाधी दिन
BOI
Sunday, August 12, 2018 | 05:05 PM
15 0 0
Share this story



सोलापूर :
‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी! लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी!’ अशा शब्दांतून ‘कामातच देव आहे’ अशी शिकवण देणाऱ्या संतशिरोमणी सावता माळी महाराज यांच्या ७२३वा समाधी दिन नुकताच झाला. त्या निमित्ताने श्री क्षेत्र अरण (ता. माढा, जि. सोलापूर) या त्यांच्या गावी लाखो भक्तांच्या साक्षीने पारंपरिक श्रीफळ हंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात शनिवारी (११ ऑगस्ट २०१८) सायंकाळी पार पडला.   

प्रथम गिड्डे वाड्यात मानाच्या कड्याची पूजा करून ते गिड्डे वाड्यातून वाजत गाजत हरी गिड्डे यांच्या डोक्यावरून श्रीफळ हंडी पारावर आणून वर बांधण्यात आले. भक्तांनी वाहिलेले नारळ त्यावर बांधण्यात आले होते. कान्होबा महाराज देहूकर यांचे हंडीसमोर काल्याचे कीर्तन झाले. यानंतर हंडी फिरती ठेवण्यात आली. त्याच वेळी संत तुकाराम महाराज याचे वंशज बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते हंडी फोडण्यास प्रारंभ झाला. या वेळी बापूसाहेब महाराज देहूकर,श्री विठ्ठल महाराज देहूकर, हरिप्रसाद महाराज देहुकर, भानुप्रसाद महाराज देहूकर, महेश महाराज देहूकर व नीलकंठ महाराज देहूकर यांनी ही हंडी फोडली. भाविक आपल्या नेत्रांनी हा स्वर्गीय सोहळा डोळ्यांत साठवत होते. अरण गावी हा सोहळा। नेत्री सुखावले देव।

भक्त एकमेकांच्या मदतीने श्रीफळ हंडीतील नारळाचा प्रसाद मिळण्यासाठी धडपड करीत होते. सुमारे आर्धा तास हा सोहळा सुरू होता. हा सोहळा पाहण्यासाठी मोडनिंब, तुळशी, वरवडे, लवूळ, भेंड पडसाळी, सोलंकरवाडी, व्होळे, जाधववाडी, बैरागवाडी येथील ग्रामस्थ, तसेच इंदापूर, टाकळी व महाराष्ट्रातील अनेक गावांतील वारकरी भाविक आणि सावता महाराजांचे भक्त उपस्थित होते. 

अशा प्रकारे महाराष्ट्रातील एकमेव अशा अविस्मरणीय श्रीफळहंडी (काला) यात्रेचा सोहळा अरणमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत झाला. याच दिवशी श्रीफळहंडी फोडण्यास सुरुवात होताच विठ्ठलाची पालखी आपोआप गदगदून हलते, लाडका भक्त सावता महाराज व ब्रह्मांडाचा राजा पांडुरंग यांची आजही भेट होते, अशी आख्यायिका वारकरी भक्त मंडळीत आहे. त्यामुळे हा क्षण पाहण्यासाठी हजारो भक्त उपस्थित होते.

या यात्रा सोहळ्यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल आबा गाजरे, सचिव विजय शिंदे, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजी कांबळे, सुधाकर कुलकर्णी, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, सरपंच सुरेखा इंगळे, पुजारी रमेश महाराज वसेकर, भीमराव वसेकर, दादा वसेकर, विठ्ठल वसेकर, जनार्दन वसेकर, अंकुश महाराज वसेकर, अमोल महाराज वसेकर, नितीन वसेकर, रमेश विठ्ठल वसेकर, हरी गिड्डे, नागनाथ गिड्डे, देवस्थान ट्रस्टचे संचालक, सेवाभावी न्यासचे संचालक, यात्रा पंचकमिटीचे संचालक, अन्नछत्र मंडळाचे संचालक, देहूकर फडकरी वारकरी, मानकरी, स्वयंसेवक, अन्नदाते यांनी परिश्रम घतले. यात्रा महोत्सव यशस्वी होण्यासाठी मोडनिंब पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, पोलिस हवालदार विनायक भानवसे, श्री. गोरे, श्री. गडधे, श्री. गरड, महिला पोलिस श्रीमती चव्हाण, हवालदार श्री. तावसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Datta Bhosale ropale About 193 Days ago
1 nambar
0
0
तानाजी इंगळे About 195 Days ago
श्रीफळहंडीचा कार्यक्रम बाईट्स आँफ इंडिया या मिडियाने प्रसिद्ध केल्याने सावता महाराज यांचा हा मिडीया पासून दुर्लक्षीत असलेला हा सोहळा जगभर भक्तांना पहायला व वाचायला मिळाला.या मिडीया चँनलचे आभार व अभिनंदन . Thanks Team , media Bites of India
0
0
Shrikant Pavane About 195 Days ago
अविस्मरणीय क्षण, खुप छान बातमी
1
0
प्रशांत गिड्डे , सोलापूर About 195 Days ago
खूपच छान बातमी आणि व्हिडीओ आहे .
0
0

Select Language
Share Link