Next
‘क्रांतिकारकांच्या ग्रंथप्रदर्शनातून इतिहासाचे स्मरण’
डॉ. न. म. जोशी यांचे प्रतिपादन
BOI
Thursday, August 08, 2019 | 03:51 PM
15 0 0
Share this article:

ग्रंथप्रदर्शन पाहताना डॉ. न. म. जोशी, चंद्रशेखर जोशी, मोहन शेटे, नितीन शास्त्री आदी

पुणे : ‘क्रांतिलेखक वि. श्री. जोशी यांचे लेखन अभ्यासपूर्ण आणि ललित शैलीतील होते. सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल, अशा स्वरूपातील ही सगळी ग्रंथसंपदा आहे. क्रांतिकारकांच्या कार्यावरील ग्रंथांचे हे प्रदर्शन इतिहासाचे स्मरण करून देणारे आहे. स्वातंत्र्याची प्रेरणा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या ग्रंथसंपदेचा परिचय व्हायला हवा,’ असे प्रतिपादन डॉ. न. म. जोशी यांनी केले.   

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, पुणे मराठी ग्रंथालय, इतिहास प्रेमी मंडळ व स्वानंद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिकारकांचे चरित्रकार वि. श्री. जोशी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त क्रांतिकारकांवरील ग्रंथांचे आणि छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी डॉ. जोशी बोलत होते. या वेळी वि. श्री. जोशी यांचे पुत्र चंद्रशेखर जोशी, इतिहास प्रेमी मंडळाचे मोहन शेटे, सावरकर स्मारकाचे नितीन शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. 


चंद्रशेखर जोशी म्हणाले, ‘क्रांतिकारकांची सर्व माहिती एकत्र करण्यासाठी वि. श्री. जोशी यांनी अनेकांशी पत्रव्यवहार केला. यातून त्यांनी क्रांतिकारकांवर ग्रंथ लिहले. याच माध्यमातून इतिहासाचा संग्रह करण्यात आला आहे. त्याचा फायदा इतिहास अभ्यासकांना होईल. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. त्यांनी केलेल्या लेखनाचे पुरावे असल्याने त्याबाबत एक विश्वासार्हता प्राप्त झाली होती.’

पुणे मराठी ग्रंथालयात आठ, नऊ आणि दहा ऑगस्ट असे तीन दिवस हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, सकाळी १० ते सायंकाळी आठ या वेळेत ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. 

मोहन शेटे यांनी प्रास्ताविक केले. विद्युत पावगी यांनी सूत्रसंचालन केले. नितीन शास्त्री यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search