Next
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये लोकसहभागातून वाय-फाय सुविधा
नाशिककरांचा प्रवास होणार हायटेक
BOI
Thursday, May 16, 2019 | 05:23 PM
15 0 0
Share this article:


नाशिक : गेल्या ४४ वर्षांपासून नाशिक जिल्ह्याची प्रवास वाहिनी ठरणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या आर्थिक सहभागाने आणि रेल्वेच्या मदतीने ‘सी-थ्री एमएसटी’ कोचमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. रेल्वेने नुकतीच या योजनेला मंजुरी दिली असून, त्याची कार्यवाही येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. लोकसहभागातून रेल्वेच्या कोचमध्ये वाय-फाय सुविधा सुरू होणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच रेल्वे ठरावी.  

  मनमाडपासून मुंबईपर्यंत रोज अडीचशे प्रवासी या गाडीने नियमित प्रवास करतात. यामध्ये नोकरदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यात महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. ‘सी-थ्री एमएसटी’ कोच दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ठरवून दिलेला आहे. नुकतेच पंचवटीच्या या नव्या कोचला एक वर्ष झाले. स्वर्गीय बिपिन गांधी यांच्या पाठपुराव्यामुळे हा नवीन कोच प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. त्यानंतर आता या कोचमधून प्रवाशांना हायटेक प्रवास करता यावा म्हणून वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यासाठी ७२ प्रवाशांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यासाठी रेल्वेनेही मंजुरी दिली असून, लवकरच वाय-फाय सेवा सुरू होणार आहे. 

प्रवासी संघटनेचे सदस्य गुरमितसिंग रावल
‘बऱ्याच वेळा नाशिकहून गाडी निघाल्यावर कसारा घाटामध्ये रेंज जाते आणि काही स्टेशनवरही रेंज नसते. म्हणून प्रवासी संघटनेने हा अभिनव उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. यासाठी साधारणपणे २५ ते ३० हजार रुपये खर्च येणार असून, वर्षाला आठ हजार रुपये देखभालीसाठी लागणार आहेत. हा सर्व खर्च सी-थ्री कोचमधून नियमित प्रवास करणारे प्रवासी उचलणार आहेत; तसेच पंचवटीच्या या डब्याला लवकरच आयएसओ सर्टिफिकेशन मिळणार आहे. यासाठीचे नियम तंतोतंत पाळले जाणार असून, वाय-फाय हा आयएसओ सर्टिफिकेशन मिळण्यासाठी महत्त्वाचा घटक ठरेल,’ अशी माहिती प्रवासी संघटनेचे सदस्य गुरमितसिंग रावल यांनी दिली.  

तुषार भवर‘या कोचमधून नियमितपणे प्रवास करणाऱ्यांचे एक कुटुंबच तयार झाले असून, पुरुष आणि महिला सर्व जण एकमेकांची काळजी घेतात,’ असे तुषार भवर यांनी सांगितले. 

‘स्वर्गीय बिपिन गांधींना अभिवादन म्हणून आम्ही हा उपक्रम करणार आहोत. बिपिन गांधींमुळे पंचवटी एक्स्प्रेसचे नाव लिम्का बुकमध्ये पोहोचले होते. तो विक्रम पुन्हा करण्याचा आमचा मानस असून, आयएसओ सर्टिफिकेशन करण्यासाठी आम्ही यापेक्षा अधिक नवनवीन उपक्रम या कोचमध्ये राबवणार आहोत, गाडी सुरू झाल्यावर अनेक वेळा रेंज कमी जास्त होते. त्यामुळे आम्ही कायमस्वरूपी वाय-फाय बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व प्रवाशांनी आर्थिक सहकार्य केले आहे,’ असे रावल यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Naval Nagpal About 67 Days ago
Congrats Gurmeet. Keep the good work going on. We all are proud of You.
0
0

Select Language
Share Link
 
Search