Next
समतानगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त व्याख्यान
BOI
Friday, October 19 | 12:44 PM
15 0 0
Share this story



भिवंडी : तालुक्यातील समतानगर, बोरिवली-पडघा येथील समाज विकास मंडळ व समतानगर येथील ग्रामस्थ यांच्या वतीने ६२ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. या निमित्त समतानगर बुद्ध विहार परिसरात व्याख्यानाचे आयोजन केले होते.
 
कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून स्तंभलेखक  दादाभाऊ अभंग उपस्थित होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व सांगताना त्यांनी शिव, फुले, शाहू, आंबेडकर चळवळ आपल्या भाषणातून मांडली. भीमाकोरेगाव विजय स्तंभाजवळील अतिक्रमण कशाप्रकारे लढा देऊन हटवले याबाबत त्यांनी माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देऊन ज्या महापुरुषांनी आपला उद्धार केला आहे त्यांना कधीच विसरू नका, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी समतानगर समाज विकास मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश जाधव यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष कृष्णा चव्हाण यांनी आभार मानले. मिलिंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link