Next
‘कर्करोगावर मात करणे शक्य’
‘सह्याद्री’तर्फे कर्करोग दिनानिमित्त विविध उपक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, February 05, 2019 | 06:01 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘संपूर्ण जगभरात जीवघेणा ठरलेल्या कॅन्सरने फक्त भारतातच ११.५ लाख रुग्णांना नव्याने ग्रासले आहे. कर्करोगाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असताना याला बळी पडलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण उपचारासाठी उशिरा पोहोचतात किंवा त्यांना उपचार उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे कर्करोग व त्याच्या प्रतिबंधाबाबत जागरूकता वाढणे गरजेचे आहे,’ असे मत सह्याद्री हॉस्पिटल्सच्या आँकोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. शोना नाग यांनी व्यक्त केले.

जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत चार फेब्रुवारी २०१९ कर्करोग जागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ‘आरोग्यदायी जीवनशैली व पोषक आहार’ या विषयावर रिबेका डिसुझा व प्रीती भक्ता यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

डॉ. नाग म्हणाल्या, ‘स्त्रियांमध्ये स्तन कर्करोग, तर पुरुषांमध्ये मुखाचा व फुफ्फुसाचा कर्करोग झपाट्याने वाढत आहेत. पुरुषांमधील होणारा फुफ्फुसाचा कर्करोग हा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने होतो. महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण चिंतेची बाब आहे. वयाच्या तिशीनंतर प्रत्येक महिलेने स्त्रीरोग तज्ञांकडून वैद्यकीय चाचणी करून घेणे गरजेचे आहे. वयाच्या पन्नाशीनंतर दरवर्षी डिजिटल मॅमोग्राफी करणे आवश्यक आहे.’

‘आपल्या आहार-विहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास कर्करोग दूर ठेवणे शक्य आहे. शहरीकरणामुळे वाढलेले प्रदूषण, मानसिक तणाव, चरबीयुक्त आहार, व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकार किंवा मधुमेह, तर होतोच; पण हे कर्करोगासाठीही जोखमीचे घटक ठरतात. त्यामुळे आपल्या शरीराबाबत जागरूक असणे व आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब कर्करोगाला दूर ठेऊ शकतो,’ असे डॉ. नाग म्हणाल्या.

मानसोपचार तज्ञ रिबेका डिसुझा म्हणाल्या, ‘प्रत्येक आजाराचा रुग्णांवर शारीरिक व मानसिक परिणाम पडत असतो. आजाराचे निदान झाल्यापासून ते उपचार पूर्ण होईपर्यंत विविध मानसिक स्थितींमधून हे रुग्ण जात असतात. अशा वेळी मानसिक आरोग्यदेखील तितकेच महत्त्वाचे असून, आपल्या मनातील भावना आपल्या कुटुंबातील जवळच्यांना सांगणे आवश्यक आहे. त्यातून समोरच्याने उपाय सांगणे अपेक्षित नसते, तर ऐकून घेतल्यामुळे रुग्णाचे मन हलके होते.’

आहारतज्ञ प्रीती भक्ता म्हणाल्या, ‘कर्करोग रुग्णांनी उपचारादरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संतुलित आहार, व्यायाम करणे उपयुक्त ठरते.’

याबरोबरच सह्याद्री हॉस्पिटलतर्फे २८ फेब्रुवारीपर्यंत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कॅन्सर तपासणी शिबिरादरम्यान कॅन्सर तज्ञांकडून मोफत मार्गदर्शन, पॅप स्मियर, पीएसए, मॅमोग्राफीवर ४० टक्के सवलत, ओपी पॅथॉलॉजी, लॅब तपासणी व इतर डायग्नोस्टीकवर ४० टक्के सवलत मिळणार आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी : ८८८८८ २२२२२
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link