Next
चिमुकल्यांनी सादर केली सांगीतिक योगासने
BOI
Monday, January 28, 2019 | 01:09 PM
15 0 0
Share this story



रत्नागिरी : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर ४८ योगासनांची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांकडून कौतुकाची थाप मिळविली. यामध्ये पहिली-दुसरीतील २३ आणि तिसरी-चौथीतील २५ मुले सहभागी झाली होती.

हा कार्यक्रम पटवर्धन हायस्कूलच्या क्रीडांगणावर झाला. संगीताच्या ठेक्यावर योगासनांचे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या सादर केले. पहिली-दुसरीच्या मुलांनी गणनायका गीतावर १७ योगासने केली. यामध्ये ताडासन, वृक्षासन, गोमुखासन, राजकपोतासन अशा अवघड योगासनांचा समावेश होता. तिसरी-चौथीच्या मुलांनी वाद्यसंगीताच्या तालावर ३१ आसने सादर केली. यामध्ये बद्धपद्मासन, वातायासन, कर्णासन, सर्वांगासन, गरुडासन, वृश्‍चिकासन, द्रोणासन या आसनांचा समावेश होता. अनंतासन, चक्रासन, भूजंगासन अशा आसनांचे एकत्रित प्रकारही या वेळी पहायला मिळाला.

या विद्यार्थ्यांना शाळेच्या योगशिक्षिका स्वाती मलुष्टे, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, गीता सावंत, प्रेरणा नागवेकर, आभा घाणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

(सोबत सांगीतिक योगासनांचा व्हिडिओ देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link