Next
गश्मीर महाजनीचा ‘स्टार प्रवाह’वर नवा कार्यक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, June 26 | 05:16 PM
15 0 0
Share this story

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा गश्मीर महाजनी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर एक अनोखा शो घेऊन येत आहे. गश्मीरचे छोट्या पडद्यावरील पदार्पण दिमाखदार असणार आहे.

गश्मीरने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता ‘स्टार प्रवाह’ आणि गश्मीर महाजनी एकत्र येऊन एक नवा आणि वेगळा कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची सध्या मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत मोठी चर्चा आहे. आजवर मराठी टेलिव्हिजनवर कधीच न झालेला प्रयोग या नव्या कार्यक्रमातून केला जाणार आहे. त्यामुळे या नव्या कार्यक्रमाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘स्टार प्रवाह’ने आजवर नेहमीच वेगळ्या मालिका, वेगळ्या कल्पना प्रेक्षकांपुढे आणल्या आहेत. नवा कार्यक्रमही त्याला अपवाद नाही; मात्र हा कार्यक्रम नेमका काय आहे, गश्मीरचे त्यात काय योगदान आहे या प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link