Next
‘महर्षी कर्वेंनी केलेल्या कार्याला फूटपट्टी लावता येणार नाही’
अर्थतज्ज्ञ प्रकाश पाठक यांचे प्रतिपादन
BOI
Wednesday, June 19, 2019 | 02:56 PM
15 0 0
Share this article:पुणे :
‘निष्ठा व श्रद्धा महर्षी कर्वेंनी जगून दाखविली. त्यांनी केलेले कार्य हे फुटपट्टी लावूनही मोजता येणार नाही. त्यांनी केलेली सेवा गुणाकाराने वाढणारी आहे. चांगली रेष मोठी करत राहणे हे आपले दायित्व आहे,’ असे मत अर्थतज्ज्ञ प्रकाश पाठक यांनी व्यक्त केले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या १२४व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विद्यार्थीनींना ११५० शैक्षणिक संचांचे वाटप करण्यात आले. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. कल्याणी टेक्नोफोर्जचे व्यवस्थापकीय संचालक समीर जाधव, मनुष्यबळ विभाग प्रमुख रोहित कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. 

या वेळी संस्थेच्या अध्यक्षा व उद्योजिका स्मिता घैसास म्हणाल्या, ‘ज्या विद्यार्थीनींना शाळेसाठी नवीन साहित्य घेणे शक्य नसते, अशा विद्यार्थीनींमध्ये कमीपणाची भावना निर्माण होऊ नये म्हणून दर वर्षी शैक्षणिक संचांचे वाटप करण्यात येते. याकरिता संस्थेला देणगीदारांकडून मदत केली जाते.’

संस्थेचे उपकार्याध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांनी कार्याक्रमाचे प्रास्ताविक  केले, तर कार्याध्यक्ष प्रमोद गोऱ्हे यांनी आभारप्रदर्शन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 114 Days ago
What he started was , and is , even today , more imporatant than political agitation . Social needs are more basic , demand long - lasting solutions . Often , they have to fight ingrained habits , which have become shackles .
0
0

Select Language
Share Link
 
Search