Next
‘क्लब एनर्जी’तर्फे वीज बचतीविषयी जनजागृती
प्रेस रिलीज
Thursday, June 07, 2018 | 12:53 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ‘क्लब एनर्जी’ ही टाटा पॉवरची राष्ट्रव्यापी संसाधन आणि ऊर्जा संवर्धन चळवळ देशभरात राष्ट्रबांधणीवर धोरणात्मक भर देऊन संसाधनांच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहे. हाच वेग कायम राखत, क्लब एनर्जीने मुंबई, नवी दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, पुणे आणि बेंगळुरू या सहा शहरांतील ३.५ दशलक्षाहून अधिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये सुमारे चार दशलक्ष एकके वीज वाचवली आहे. गेल्या वर्षात क्लब एनर्जी हा कार्यक्रम राजस्थानातील अजमेर या नवीन शहरातही सुरू करण्यात आला.

क्लब एनर्जी २००७ सालापासून ५०० शाळांमध्ये सक्रिय आहे. त्यांनी भारतभरात एकूण दोन हजार १७ एनर्जी स्कूल क्लब्ज तयार केले आहेत. क्लबने शालेय विद्यार्थ्यांमधून आतापर्यंत दोन लाख ५५ हजार ७८३ एनर्जी चॅम्पियन्स आणि दोन लाख ९८ हजार ४६८ एनर्जी अँबेसिडर्स तयार केले आहेत. क्लब एनर्जी कार्यक्रमाने १० वर्षेही पूर्ण केली आहेत.

या यशाबद्दल टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, ‘क्लब एनर्जी ही चळवळ सुरू केल्याचा तसेच ऊर्जा संवर्धनाचा संदेश देशभरात पोहोचवण्यामध्ये लक्षणीय पल्ला गाठल्याचा आम्हाला, टाटा पॉवरला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. पृथ्वीच्या रक्षणाच्या या कामात मदत केल्याबद्दल आम्ही विद्यार्थी, शाळा आणि आमच्या टीमचे आभार मानतो; तसेच भविष्यकाळातही आमच्या प्रयत्नांनी अनेक आयुष्ये उजळून टाकण्याचे वचनही देतो.’

या उपक्रमांचा भाग म्हणून ‘क्लब एनर्जी’ने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऊर्जासंवर्धन रॅली, पथनाट्य, प्रश्नमंजूषा, पोस्टर स्पर्धा आणि लोणावळ्यातील टाटा पॉवर महसीर हॅचरीला भेट आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. संवर्धन प्रकल्पांबाबत जागरूकता वाढवण्यात या कार्यक्रमांची मोठी मदत झाली; तसेच पर्यावरणाबद्दल प्रत्यक्ष ज्ञानही यातून मिळाले. आज ही ऊर्जा व नैसर्गिक संसाधने वाचवण्यासाठी एक संपूर्ण चळवळ झाली आहे.

‘क्लब एनर्जी’ची मदार देशातील तरुणाईवर आहे आणि ऊर्जेचा अपव्यय टाळण्यावर या चळवळीने प्रामुख्याने काम केले आहे. याचा उपयोग पर्यायाने हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि जागतिक उष्मा तसेच हवामान बदलाच्या समस्या हाताळण्यात होणार आहे. आपल्या विविध उपक्रमांद्वारे लहान मुलांना भविष्यकाळाचे सक्रिय नेते म्हणून घडवून, जबाबदार नागरिक करण्याचे काम टाटा पॉवरचा ‘क्लब एनर्जी’ कार्यक्रम करत राहील.

टाटा पॉवरविषयी :
टाटा पॉवर ही भारतातील सर्वांत मोठी एकात्मिक वीज कंपनी असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचा विस्तार होत आहे. कंपनी, तिच्या सर्व उपकंपन्या आणि संयुक्तरित्या नियंत्रित कंपन्या अशा सर्वांची मिळून १० हजार ७५७ मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता आहे; तसेच ऊर्जा क्षेत्राच्या सर्व विभागांमध्ये, म्हणजेच- इंधन सुरक्षा व लॉजिस्टिक्स, निर्मिती (औष्णिक, जल, सौर व पवनऊर्जा), पारेषण, वितरण व व्यापार यांमध्ये कंपनी काम करत आहे.

भारतात वीजनिर्मिती, पारेषण आणि वितरण यांसाठी कंपनी यशस्वीरित्या सार्वजनिक-खासगी भागीदारीतील प्रकल्प राबवत आहे. उत्तर दिल्लीमध्ये वीजवितरणासाठी दिल्ली विद्युत बोर्डासोबत टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेड, भूतानमधील ताला जलविद्युत प्रकल्पातून विजेचे निर्वासन (इव्हॅक्युएशन) करून दिल्लीला आणण्यासाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत ‘पॉवरलिंक्स ट्रान्समिशन लिमिटेड’ आणि झारखंडमध्ये एक हजार ५० मेगावॉटच्या प्रकल्पासाठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनसोबत ‘मैथोन पॉवर लिमिटेड’ ही या प्रकल्पांची काही उदाहरणे आहेत.

टाटा पॉवर भारतातील २.६ दशलक्ष ग्राहकांना वितरणसेवा देत आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर आधारित असा देशातील पहिला चार हजार मेगावॉट क्षमतेचा महाऊर्जा प्रकल्प कंपनीने गुजरातमधील मुंद्रा येथे विकसित केला आहे. टाटा पॉवर ही भारतातील सर्वांत मोठ्या नूतनीकरणीय ऊर्जा कंपन्यांपैकी एक असून, स्वच्छ (पर्यावरणपूरक) ऊर्जेची कंपनीची श्रेणी तीन हजार ४१७ मेगावॉट इतकी आहे.

‘टाटा पॉवर क्लब एनर्जी’विषयी :
टाटा पॉवरने आपला शाळांपर्यंत पोहोचणारा कार्यक्रम ‘टाटा पॉवर क्लब एनर्जी’ २००७मध्ये सुरू केला. २००९मध्ये क्लब एनर्जीने आपल्या कार्यक्रमांचे रूपांतर राष्ट्रव्यापी चळवळीत करून मोठी झेप घेतली. या कार्यक्रमाचे कार्यक्षेत्र मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, बेंगळुरू, कोलकाता, बेळगाव, जमशेदपूर आणि लोणावळा येथील ५००हून अधिक शाळांमध्ये विस्तारले. यापुढे जाऊन या कार्यक्रमाने १० लाखांहून अधिक नागरिकांना जागरूक करण्याचे तसेच दहा लाखांहून अधिक वीज एकके वाचवण्याचे उद्दिष्ट साध्य करत नवीन पल्ला गाठला.

तिसरी ते नववीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना दृक-श्राव्य तसेच पॉवरपॉइंट सादरीकरणांसारख्या कल्पक प्रारूपांच्या माध्यमातून ऊर्जासंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. मुलांना या सत्रांदरम्यान ऊर्जा वाचवण्याच्या, तसेच संसाधन संवर्धनाच्या टिप्स दिल्या जातात. या टिप्स वापरून त्यांनी लक्षणीय प्रमाणात ऊर्जा वाचवल्याचे दिसून आले आहे. क्लब एनर्जी चळवळ १५ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचली आहे. या कार्यक्रमाने आतापर्यंत २१ दशलक्ष एकके इतकी वीज एकत्रितपणे वाचवली आहे आणि देशातील ११ शहरांतील २५० शाळांमध्ये क्लब एनर्जी काम करत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link