Next
‘माउंट कांचनजुंगा’ मोहिमेचा श्रीगणेशा ‘किल्ले शिवनेरी’वर
BOI
Wednesday, February 20, 2019 | 04:00 PM
15 0 0
Share this story


पुणे : भारतातील अग्रगण्य गिर्यारोहण संस्था ‘गिरिप्रेमी’ येत्या एप्रिल-मे महिन्यामध्ये जगातील तिसरे उंच शिखर व भारतातील सर्वात उंच शिखर ‘माउंट कांचनजुंगा’ वर महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम घेऊन जात आहे. या मोहिमेचा भगवा ध्वजप्रदान कार्यक्रम येत्या रविवारी, २४ फेब्रुवारी २०१९ रोजी किल्ले शिवनेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. 

श्री साई बाबा संस्थान, शिर्डीचे अध्यक्ष व हावरे बिल्डर्स व इंजिनीअर्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचा भगवा ध्वज मोहिमेचे नेते उमेश झिरपे व इतर संघ सदस्यांना सुपूर्द करतील. तसेच, मोहिमेतील सर्व सदस्य, गिरिप्रेमीचे सदस्य व हितचिंतक श्री शिव छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून मोहिमेसाठी आशीर्वाद घेतील. महाराष्ट्राचा भगवा ध्वज म्हणजे शौर्याचे प्रतिक. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या धीरोदात्त कामगिरीचे, साहसाचे व हिंदवी स्वराज्याचे निशाण. गौरवशाली परंपरेचे प्रतिक असलेला भगवा गिरिप्रेमी आता भारतातील सर्वात उंच शिखरावर घेऊन जात आहे. ही मोहीम महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नागरी मोहिमेच्या माध्यमातून भगवा ‘माउंट कांचनजुंगा’वर फडकणार आहे. 


आठ हजार ५८६ मीटर उंच असलेले ‘माउंट कांचनजुंगा’ हे जगातील उंचीनुसार तिसरे शिखर आहे; तसेच भारतातील सर्वात उंच शिखर आहे. या शिखरावर खूप कमी मोहिमा आखल्या जातात. या शिखरावर आत्तापर्यत फक्त ४०० च्या आसपास गिर्यारोहकच चढाई करू शकले आहेत. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या या शिखरावर गिरिप्रेमीने महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम आयोजित केली आहे. चढाईसोबतच ही मोहीम पर्यावरणपूरक असून, कांचनजुंगा शिखर परिसरामध्ये व जैवविविधता क्षेत्रामध्ये पर्यावरण संवर्धनाचे व स्वच्छतेचे विशेष काम मोहिमेअंतर्गत हाती घेण्यात आले आहे.   

या मोहिमेला पाठिंबा दर्शविण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी व ध्वजप्रदान कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन गिरिप्रेमीने केले आहे. 

किल्ले शिवनेरी येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ९८९०४९९९५५, ८९७५३ ९८८८६, ८४४६६ ८१११७ ,९८२२३ २३१४७   
इमेल : giripremi@gmail.com  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link