Next
चंद्रावर उल्कावर्षावातून जलवर्षाव
‘नासा’च्या नव्या संशोधनातील निष्कर्ष
BOI
Tuesday, April 16, 2019 | 12:44 PM
15 0 0
Share this article:

मेरिलँड (अमेरिका) : चंद्रावरच्या पाण्यासंदर्भात नवा शोध ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांना लागला आहे. चंद्राभोवतीच्या वातावरणात उल्कावर्षावादरम्यान पाण्याचा वर्षाव होतो, असे ‘नासा’च्या यानाने नोंदविलेल्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. 

ल्युनार अॅटमॉस्फिअर अँड डस्ट एन्व्हायर्न्मेंट एक्स्प्लोअर (लाडी) हे यान ऑक्टोबर २०१३ ते एप्रिल २०१४ या कालावधीत चंद्राभोवती फिरले होते. ते यान म्हणजे एक रोबॉटिक मिशन म्हणजे रोबोद्वारे पार पाडलेली मोहीम होती. चंद्रालगतचे वातावरण (एक्झोस्फिअर) कसे आहे, याचा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडण्यात आले होते. 

‘चंद्राभोवतीच्या वातावरणात बहुतांश वेळा पाणी (H2O) किंवा हायड्रॉक्साइड (OH) नसते; पण चंद्र जेव्हा उल्कावर्षावाच्या प्रवाहातून फिरतो, तेव्हा नोंदवली जाण्याएवढी वाफ तयार झाल्याचे आढळले. उल्कावर्षाव संपल्यानंतर पाणी किंवा हायड्रॉक्साइड हे घटक नाहीसे झाल्याचे आढळले,’असे या प्रकल्पावरील शास्त्रज्ञ रिचर्ड एल्फिक यांनी सांगितल्याचे ‘नासा’च्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. मेहदी बेन्ना यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संशोधनाचे निष्कर्ष ‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. 

या संशोधनामुळे चंद्रावरील पाण्याचा इतिहास समजून घ्यायला मदत होणार असून, चंद्राचा भूगोल आणि त्याची उत्क्रांती यांविषयीही अधिक जाणून घेता येणार आहे. चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे याआधीही सापडले आहेत; मात्र चंद्राच्या ध्रुवांनजीकच्या खड्ड्यांमधील बर्फाच्या स्वरूपात असलेले पाणी कसे आले, यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास या संशोधनातून मदत होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

असे असले तरी, चंद्रावर असलेले सगळे पाणी या उल्कावर्षावातूनच आलेले नाही, असे त्याच प्रकल्पातील दुसऱ्या शास्त्रज्ञ डेना हर्ले यांनी स्पष्ट केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
उमेश मेहेन्दले About 85 Days ago
वेरी गुड
0
0

Select Language
Share Link
 
Search