Next
निवृत्तीवेतनासाठी २० मार्चपर्यंत जन्मतारखेचा पुरावा पाठविण्याचे आवाहन
प्रेस रिलीज
Wednesday, March 13, 2019 | 12:59 PM
15 0 0
Share this story

मुंबई : वांद्रे येथील अधिदान व लेखा कार्यालयातून (पीएओ) निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्यांनी २० मार्च २०१९पर्यंत जन्मतारखेचा पुरावा कार्यालयास पाठविण्याचे आवाहन सहायक लेखा व अधिदान अधिकाऱ्यांनी केले आहे.

ज्या निवृत्तीवेतनधारकांचे, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे वय ८०वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाले आहे. त्यांच्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मुळ निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतनात वाढ करण्यात आली आहे.  त्याची परिगणना करण्याची जबाबदारी अधिदान व लेखा कार्यालयाची असल्यामुळे या कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी, आपल्या जन्मतारखेचा पुरावा किंवा जन्मतारखेचा उल्लेख असलेली अधिप्रमाणित कागदपत्रे जसे आधार कार्ड, पॅन कार्ड या कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. हा पुरावा या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन, पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे २० मार्चपर्यंत पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोस्टाने कागदपत्रे पाठविण्यासाठी पत्ता : अधिदान व लेखा कार्यालय, लेखा कोष भवन, ए विंग कौटुंबिक न्यायालयाजवळ, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१.  
ई-मेल : pao@mahakosh.in
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link