Next
प्रत्यक्ष कर संकलनात दहा वर्षांतील विक्रमी वाढ
नोटाबंदीचा परिणाम असल्याचा अर्थमंत्रालयाचा अहवाल
BOI
Thursday, January 03, 2019 | 04:29 PM
15 0 0
Share this story


नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने साधारणत: दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयावर विविध स्तरांतून जोरदार टीका झाली असली, तरी त्यामुळे प्रत्यक्ष कर भरण्यात विक्रमी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नोटाबंदीनंतर वैयक्तिक करदात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, प्रत्यक्ष कर आणि जीडीपी यांच्यातील गुणोत्तर गेल्या दहा वर्षांतील विक्रमी पातळीवर पोहचले आहे. 

 केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये प्रत्यक्ष कर आणि जीडीपी यांच्यातील गुणोत्तर वाढून ५.९८ टक्क्यांवर पोहोचले आहे.  हा गेल्या दहा वर्षांतील विक्रम ठरला आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये प्रत्यक्ष कर आणि जीडीपी यांच्यातील गुणोत्तर ५.५७ टक्के, तर २०१५-१६ मध्ये ते ५.४७ टक्के होते. 

अर्थ मंत्रालयाने २०१८मध्ये घेतलेल्या आढाव्यानुसार, प्रत्यक्ष कर आणि जीडीपी यांच्या गुणोत्तरात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. २०१७-१८मध्ये हे गुणोत्तर प्रथमच ५.९८ टक्क्यांवर पोहोचले. गेल्या चार आर्थिक वर्षांमध्ये प्राप्तिकर विवरणपत्रांची संख्या ८० टक्क्यांनी वाढली आहे. वैयक्तिक करदात्यांकडून भरण्यात येणाऱ्या प्राप्तिकर विवरणपत्रांच्या संख्येतही ६५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. २०१३-१४ मध्ये विवरणपत्रांची संख्या ३.७९ कोटी होती, ती २०१७-१८ मध्ये ६.८५ कोटींवर पोहोचली आहे. २०१३-१४मधील वैयक्तिक विवरण पत्र भरणाऱ्यांची संख्या ३.३१ कोटी होती, ती २०१७-१८मध्ये ५.४४ कोटींवर पोहोचली आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये विविध गटातील वैयक्तिक करदात्यांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये विवरणपत्र भरणाऱ्यांनी २६.९२ लाख कोटी रुपयांचे ढोबळ उत्पन्न घोषित केले होते. ते आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये ६७ टक्क्यांनी वाढून ४४.८८ लाख कोटी रुपयांवर  पोहोचले. या वाढीव उत्पन्नामुळे कररचनेपासून दूर राहिलेला मोठा वर्ग करकक्षेत आला आहे. करपरताव्याचे प्रमाणही गेल्या वर्षीच्या तुलनेत २.०८ टक्क्यांनी वाढले आहे.  

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link