Next
‘महिंद्रा’तर्फे ‘मराझ्झो’चे अनावरण
प्रेस रिलीज
Tuesday, September 04, 2018 | 01:50 PM
15 0 0
Share this article:

नाशिक : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (एमअँडएम) या भारतातील प्रीमिअम एसयूव्ही उत्पादकाने ‘मराझ्झो’ दाखल केली. ‘मराझ्झो’मध्ये सर्वोकृष्ट अभियांत्रिकीचा वापर केला आहे आणि त्यामध्ये आरामदायी व तत्पर नियंत्रण, शांत केबिन, शीघ्र कूलिंग व आतमध्ये ऐसपैस जागा अशा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. तीन सप्टेंबरपासून भारतभरातील महिंद्रा डीलरशिपमध्ये ‘मराझ्झो एम२’ ९.९९ लाखांपासून (एक्स-शोरूम) उपलब्ध होणार आहे.

या प्रसंगी ‘महिंद्रा’चे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, ‘मराझ्झो दाखल करणे, हा ‘महिंद्रा’च्या केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील वाटचालीतला अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. महिंद्रा ऑटोमोटिव्ह नॉर्थ अमेरिका (एमएएनए) आणि महिंद्रा रिसर्च व्हॅली (एमआरव्ही) यांचा उत्पादन विकसित करण्याचा पहिला संयुक्त प्रयत्न असलेली ‘मराझ्झो’ आमच्या ‘राइज’ या विचासरणीचे हुबेहूब प्रतिबिंब आहे. आमच्यासाठी कायापलट ठरेल, असे वाहन तयार करण्यासाठी आमच्या टीमनी चाकोरीबाहेर विचार केला व सर्व मर्यादांवर मात केली. आम्ही नव्या विश्वामध्ये प्रवेश करत आहोत आणि यापुढेही अशी वाहने सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.’

वाहन दाखल करताना ‘महिंद्रा’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका म्हणाले, ‘महिंद्राच्या नव्या, जागतिक दृष्टिकोनाची झलक ‘मराझ्झो’मध्ये दिसून येते. हे वाहन उत्कृष्ट ठरण्यासाठी डेट्रॉइटमध्ये तयार केले आहे, त्याची आखणी इटलीतील पिनिनफरिनाच्या सहयोगाने आमच्या इन-हाउस टीमने केली आहे, तसेच हा संपूर्ण प्रकल्प चेन्नईजवळील एमआरव्ही या आमच्या अद्ययावत संशोधन व विकास प्रकल्पात साकारला आहे. ग्राहकांना अद्वितीय गुणवत्ता व खऱ्या अर्थाने उत्तम अनुभव देणाऱ्या आमच्या ऑटोमोटिव्ह उत्पादनांना ‘मराझ्झो’मुळे नवी दिशा मिळाली आहे.’

‘महिंद्रा’चे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वढेरा म्हणाले, ‘महिंद्राच्या यूव्ही श्रेणीच्या वाटचालीमध्ये ‘मराझ्झो’ने नवा अध्याय रचला आहे. उत्तमोत्तम उत्पादने निर्माण करणे व नव्या श्रेणी तयार करणे, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. ‘मराझ्झो’च्या निमित्ताने आम्ही ही परंपरा कायम राखली आहे. आकर्षक स्टाइल, आरामदायी प्रवास, तत्पर नियंत्रण, ऐसपैस जागा, उत्तम एनव्हीएच स्तर व आकर्षक किंमत अशा खास वैशिष्ट्यांमुळे ‘मराझ्झो’ सर्वांची पसंती मिळवणार आहे, असा विश्वास आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search