Next
राज्यात अॅमेझॉनवरून स्मार्टफोन्सची सर्वाधिक खरेदी
प्रेस रिलीज
Thursday, April 19 | 05:37 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र ही अॅमेझॉनवरील स्मार्टफोन्सची सर्वात मोठी बाजारपेठ ठरली आहे. महाराष्ट्रात  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अॅमेझॉनवरून स्मार्टफोन विकत घेण्याचे प्रमाण तब्बल दीडपट वाढले आहे. विशेष म्हणजे यात पुणे सर्वात आघाडीवर आहे. मुंबई आणि पुण्यानंतर ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांतून स्मार्टफोन विभागातील उत्पादनांना सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले आहे.

अॅमेझॉन इंडियाच्या स्मार्टफोन्स आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक मनीष थापा
‘महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी स्मार्टफोन हा मोठ्या जिव्हाळ्याचा विषय असून उत्तमोत्तम स्मार्टफोन्सच्या ऑनलाइन खरेदीची त्यांना आवड आहे. म्हणूनच जळगाव, सातारा, धुळे, अकोला, बुलढाणा आणि वर्धा अशा तुलनेने छोट्या शहरांतूनसुद्धा या उत्पादनांना मागणी येत आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सर्वाधिक विकल्या गेलेल्या काही स्मार्टफोन ब्रॅंडसमध्ये शिओमी, मोटोरोला, सॅमसंग, वनप्लस, लेनोव्हो आदी ब्रॅंडसचा समावेश होता. महाराष्ट्रातील ग्राहकांनी खरेदीसाठीचे इप्सित स्थळ म्हणून आमची निवड केली ही गोष्ट भारावून टाकणारी आहे. आमच्याकडे स्मार्टफोन्सचा विशाल संग्रह असल्याने जवळजवळ प्रत्येक किंमतीच्या गटातील प्रत्येक ग्राहकाची मागणी आमच्या मंचावर पूर्ण होते. पहिलीवहिली वस्तू विकत घेणारे ग्राहक आपल्या या ऑनलाइन खरेदीचा शुभारंभ स्मार्टफोनपासून करतात. उंची स्मार्टफोन्सही पुणे आणि महाराष्ट्रभरातील ग्राहकांच्या आवडीचे असल्याचे दिसून येत आहे,’ असे अॅीमेझॉन इंडियाच्या स्मार्टफोन्स आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे वरीष्ठ व्यवस्थापक मनिष थापा म्हणाले.

‘सर्वोत्तम सिलेक्शन, खास अॅमेझॉनवर उपलब्ध उत्पादनांची विस्तृत श्रेणी आणि सर्वात आकर्षक किंमती देण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. याला वेगवान आणि विश्वासार्ह वितरण सेवेचीही जोड देण्यात आल्याने येत्या काळात ग्राहकांना आम्ही खरेदीचा अखंड अनुभव देऊ शकू’, असेही ते म्हणाले.

‘अॅमेझॉनने राज्यात १४ फुलफिलमेंट सेंटर्स स्थापन केली आहेत. त्यांची क्षमता तीस लाख क्युबिक फुटांहून अधिक आहे. यापैकी दोन सेंटर्स पुण्यात आहेत. वितरणाचे मजबूत जाळे उभारले असल्याने ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तू वेगाने मिळतात. अॅमेझॉनवर स्मार्टफोन्सचा सर्वात मोठा साठा असून केवळ अॅमेझॉनवर उपलब्ध असे दोनशे ५० पेक्षा  अधिक स्मार्टफोन्स आहेत. अगदी किमान किंमत गटापासून ते उंची उत्पादनगटापर्यंत पर्याय उपलब्ध असून, महागडे स्मार्टफोन ऑनलाइन विकत घेण्यातील साशंकता आणि चिंता दूर करण्यासाठी डिलिव्हरीच्या वेळी रोख किंवा  क्रेडिट/डेबिट कार्ड्सद्वारे पैसे भरण्याचा पर्यायही उपलब्ध आहे’, असेही  थापा यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link