Next
‘तुंबाड’चा टीझर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा
BOI
Thursday, August 23 | 06:37 PM
15 0 0
Share this story

निर्माते आनंद एल. रॉय

अलीकडे मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट हाताळण्याचे प्रयोग मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. अशातच ‘तुंबाड’ या नवीन आणि वेगळ्या विषयावरील थरारपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून हा टीझर अंगावर रोमांच उभे करणारा आहे. 

सोहम शाहअभिनेता सोहम शाह याने ‘शिप ऑफ थिसियस’ या चित्रपटातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तुंबाडच्या माध्यमातून सोहम पुन्हा हा प्रयत्न करताना दिसत आहे. राही अनिल बर्वे दिग्दर्शित या चित्रपटाची कथा महाराष्ट्राशी संबंधित आहे. त्यामुळे या चित्रपटाचे बहुतांश शुटिंग महाराष्ट्रात झाले आहे.  

तब्बल १६ कोटी देवांनी पृथ्वीच्या पोटातून जन्म घेतला. परंतु पृथ्वीचे प्रेम आपल्या पहिल्या बालकावर अधिक. तो अनेक वर्षे पृथ्वीच्या पोटात झोपून राहिला. आपल्यातल्या काही पूर्वजांनी त्याला त्याच्या या चिरनिद्रेतून जागे करण्याचे कृत्य केले, जे खरे तर एक महापापच होते. परंतु हे महापाप आपल्यासाठी मात्र वरदान ठरले आहे... अशी काहीशी कथा तुंबाडच्या टीझरमधून सांगितली आहे. 

१९२०च्या काळातील ही कथा पुण्यातील एका प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांभोवती फिरणारी आहे. आनंद एल. रॉय यांची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबरला हिंदी आणि मराठी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सोहम शाह, अनिता दाते, दीपक दामले, ज्योती माळे, रंजिनी चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link