Next
रत्नागिरीत जिल्हास्तरीय दांडिया स्पर्धा
प्रेस रिलीज
Monday, October 08 | 03:26 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : येथील स्वामी इव्हेंट्स आणि आकांक्षा फोटो स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी  जिल्हास्तरीय दांडिया २०१८ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे.

शहरातील माळनाका परिसरातील जयेश मंगल पार्क येथे १६ व १७ ऑक्टोबर या दोन दिवशी सायंकाळी सात वाजता ही स्पर्धा रंगणार आहे. या बरोबरच लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पब्लिक राउंड, कपल डान्स स्पर्धा ही घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे औचित्य साधून रत्नागिरीतील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांचा ‘नवदुर्गा सन्मान’ किताब देऊन सत्कार केला जाणार आहे.

‘गेली दोन वर्षे या स्पर्धेला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. याही वर्षी नागरिकांनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असे आवाहन स्वामी इव्हेंट्सचे जयेश पाथरे, प्रथमेश साळवी, रोहन राणे आणि आकांक्षा फोटो स्टुडिओचे सचिन झगडे यांनी केले आहे.

स्पर्धेविषयी :
दिवस :
१६ व १७ ऑक्टोबर २०१८
वेळ : सायंकाळी सात वाजता
स्थळ : जयेश मंगल पार्क, माळनाका, रत्नागिरी  
नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक : ८८०५२ ४०७०६, ९५०३६ ०३८३५, ९५२७७ ७९७९५, ७७५७९ ३९६२८.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link