Next
‘फुलरटन इंडिया’ला ‘क्रिसिल ए१+’ प्रमाणन
प्रेस रिलीज
Thursday, May 24 | 12:28 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ​​फुलरटन इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड (फुलरटन इंडिया) या भारतभरात प्रबळ उपस्थिती असलेल्‍या आघाडीच्‍या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीला क्रिसिलकडून दीर्घकालीन सुविधांसाठी (बँक लोन, एनसीडी व एसडी) 'क्रिसिल एएए/स्‍टेबल प्रमाणन आणि लघुकालीन सुविधांसाठी (सीपी) ‘क्रिसिल ए१+’ प्रमाणन मिळाले आहे. या घोषणेसोबतच ‘फुलरटन इंडिया’ला क्रिसिल व केअर या दोन एजन्‍सींकडून एएए प्रमाणन मिळाले आहे.

‘फुलरटन इंडिया’ला टेमासेक होल्डिंग्‍ज प्रायव्‍हेट लिमिटेडची उपकंपनी फुलरटन फायनान्शियल होल्डिंग्‍जमधील (एफएफएच) प्रबळ उपस्थिती, उत्‍तम भांडवल, सोईस्‍कर उत्‍पन्‍न, अनुभवी व्‍यवस्‍थापन आणि प्रबळ लिक्विडिटी व्‍यवस्‍थापनासाठी हे प्रमाणन मिळाले आहे.

या घोषणेबाबत बोलताना ‘फुलरटन’च्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि व्‍यवस्‍थापकीय संचालिका राजश्री नाम्बियार म्‍हणाल्‍या, ‘क्रिसिलकडून मिळालेले उच्‍च प्रमाणन देशाच्‍यावंचित बाजारपेठांना सेवा देण्‍यासाठी असलेली आमची दीर्घकालीन कटिबद्धता सादर करते. हे प्रमाणन कंपनीला ऑन-शोअर व ऑफ-शोअर लीडर्सकडून व्‍यापक स्‍वीकृती मिळण्‍यामध्‍ये मदत करेल.’

क्रिसिलच्‍या मते ‘फुलरटन इंडिया’ ‘एफएफएच’साठी अत्‍यंत महत्त्वपूर्ण आहे. ‘एफएएफएच’ने आपल्‍या जागतिक धोरणासह ग्रामीण/लघु व मध्‍यम न्‍टरप्राइज (एसएमई) विभागांमध्‍ये आपली उपस्थिती वाढवली आहे. वर्षानुवर्षे धोका व्‍यवस्‍थापन प्रक्रिया व डेटा विश्‍लेषण क्षमता प्रबळ करण्‍यात आल्‍या आहेत. नियमांचे पालन आणि यंत्रणांची देखरेखमध्‍ये देखील बदल दिसण्‍यात आला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link