Next
अंजुरफाटा शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
मिलिंद जाधव
Friday, August 17, 2018 | 01:15 PM
15 0 0
Share this article:



भिवंडी :
ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘तंबाखूमुक्त भारत’ या संकल्पनेतून प्रभातफेरी काढण्यात आली. या वेळी या संदर्भातील घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या वेळी सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथही देण्यात आली.

उपसरपंच प्रदीप पाटील यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. या वेळी सरपंच राजेंद्र मढवी, राहनाल ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी नरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह प्रमाणात पालक आणि नागरिक उपस्थित होते. शाळेने राबविलेल्या ‘ऑगस्ट क्रांती पंधरवडा’ उपक्रमात प्रथम क्रमांक आलेल्या पाचवीच्या संघाला सरपंच राजेंद्र मढवी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपसरपंच प्रदीप पाटील यांनी १००१ रुपयांचे रोख पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. या वेळी ग्रामपंचायत राहनालतर्फे मागील वर्षी वार्षिक परीक्षेतील पहिल्या तीन क्रमांकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना  बक्षिसे देण्यात आली. 

या कार्यक्रमात शहीद कौस्तुभ राणे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी शाळेचे कौतुक केले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका पुष्पलता गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब राऊत यांनी, तर आभारप्रदर्शन विजयकुमार जाधव यांनी केले. सर्व शिक्षकांना चांगल्या शैक्षणिक कामगिरीबद्दल ग्रामपंचायतीकडून भेटवस्तू देण्यात आली. विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search