Next
गोदरेजचा ऊर्जा बचत करणारा एसी
प्रेस रिलीज
Tuesday, February 27 | 11:50 AM
15 0 0
Share this story


मुंबई : ‘सोच के बनाया है’ या ब्रँडच्या तत्त्वज्ञानासह कार्यरत असणारी ‘गोदरेज अप्लायन्सेस’ ही घरगुती उपकरणांमधील अग्रणी कंपनी आहे. तिच्यातर्फे ६.१५ इतक्या सर्वोच्च आयएसईईआरसह भारतातील सर्वात जास्त ऊर्जा बचत करणाऱ्या एअर कंडिशनरचे उद्घाटन २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. सध्याच्या बीईई ऊर्जा गुणांकन नियमांच्या फाइव्ह स्टार गरजांची पूर्तता करण्याबरोबरच, हा एसी २०१९च्या प्रस्तावित बीईई ऊर्जा टेबलच्या फाइव्ह स्टार गरजांचीही पूर्तता करतो. यामुळेच हे भविष्यातील सुसज्ज उपकरण झाले आहे.

जास्त ऊर्जा वापरणारे उपकरण म्हणून आतापर्यंत एअर कंडिशनरची ओळख आहे. सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी बिल आणणारे आणि ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार असणारे, हे उपकरण ठरले आहे. परंतु, गोदरेजने हे उत्पादन ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक अशा वैशिष्ट्यांसह तयार केले आहे. गोदरेजच्या अनोख्या ग्रीन इन्व्हर्टर टेक्नोलॉजीचा समावेश असलेला हा एसी म्हणजे, इन्व्हर्टर टेक्नोलॉजी आणि ग्रीन बॅलन्स टेक्नोलॉजी यांचे उत्तम समीकरण आहे. यामुळे सर्वात जास्त प्रमाणात ऊर्जा सक्षमता प्राप्त होते. तसेच, वर्ल्डस् ग्रीनेस्ट रेफ्रिजरंट आर २९० वापरणारा हा पहिला पर्यावरणपूरक एसी ठरला आहे. शून्य ओझोन कमी करण्याची क्षमता आणि कमीत कमी ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावण्याची क्षमता या उत्पादनात आहे. इतकेच नाही, तर यात इको मोड हे प्रमुख वैशिष्ट्यही समाविष्ट आहे. यामुळे २५ टक्क्यांनी ऊर्जेचा कमी वापर केला जातो. नव्या ६.१५ आयएसईईआरसह असलेल्या गोदरेज एनएक्सडब्ल्यू एअर कंडिशनरमध्ये एक्स बीएलडीसी (ब्रश लेस डीसी) तंत्रज्ञान, इंटेलिजंट एअर थ्रो आणि युजर डिफाइन्ड एअर थ्रो तंत्रज्ञान अशा इतर अत्याधुनिक कुलिंग वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यामुळेच आमच्या ग्राहकांसाठी संबंधित नाविन्यपूर्ण उपकरणे विचारपूर्वक बनवण्यात आली आहेत. बाजारातील इतर कुठल्याही एसीपेक्षा, नवा गोदरेज एनएक्सडब्ल्यू एसी कमीत कमी ऊर्जा वापरतो. 

या उद्घाटनाविषयी, गोदरेज अप्लायन्सेसचे व्यावसायिक प्रमुख आणि इव्हीपी कमल नंदी म्हणाले, ‘गोदरेजने अधिक चांगल्या जीवनासाठी दिलेले आपले वचन नेहमीच खरे ठरवले आहे. आमच्या भागधारकांना नाविन्यपूर्णता आणि संबंधित तंत्रज्ञानाद्वारे, आम्ही नेहमीच आनंदी केले आहे आणि आमचे पर्यावरणाबद्दलचे वचनही पाळले आहे. शाश्वतता हे गोदरेजचे खरे मूल्य आहे. एसीसारख्या ऊर्जा वापरणाऱ्या उपकरणाबाबत बोलायचे, तर आम्ही हे अधिक चांगल्या प्रकारे खरे करून दाखवले आहे. आम्ही वर्षांनुवर्षे उद्योगक्षेत्रात नवेनवे विक्रम घडवण्यासाठी काम केले आहे, आमची उत्पादने ऊर्जा सक्षम बनवली आहेत. 
अलिकडेच ऊर्जा क्षेत्राच्या पलिकडे जात आम्ही सर्वोत्तम सक्षम उपकरणे देऊ केली आहेत. नव्या ६.१५ आयएसईईआरसह गोदरेज एनएक्सडब्ल्यू एसीने या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. सर्वोत्तम असे गोदरेज एनएक्सड्ब्ल्यूचे प्रमुख तंत्रज्ञानही या अस्सलपणावर आधारित आहे.’

गोदरेज अप्लायन्सेसचे नॅशनल सेल्सचे प्रमुख संजीव जैन म्हणाले, ‘एअर कंडिशनर्ससारख्या उपकरणामुळे सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी वापरली जाते. महिन्यातील सर्वात मोठा खर्च इलेक्ट्रिसिटीचे बिल भरण्यात होतो. ग्राहकांची ही बाजू लक्षात घेता; आम्ही ६.१५ आयएसईईआरसहच्या गोदरेज एनएक्सडब्ल्यू एसीची निर्मिती केली. हा भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बचत करणारा ग्रीन इन्व्हर्टर एसी आहे, याद्वारे कमीत कमी प्रमाणात वीज वापरली जाते आणि त्याचे बिलही कमी येते. गोदरेज अप्लायन्सेसच्या उद्घाटनाबरोबर येत्या उन्हाळ्यातील बाजारातील दहा टक्के मार्केट शेअर घेण्याचे ध्येयही समोर ठेवण्यात आलेले आहे. एअर कंडिशनर्ससाठीचा हा उत्तम मोसम आहे.’

हे उत्पादन सर्व माध्यमांमध्ये आणि अग्रणीच्या दुकानांत गोदरेज स्मार्टकेअर सर्व्हिसद्वारे पुरवले जाईल. गोदरेज स्मार्टकेअरतर्फे सर्वात जलद सेवा देण्यात येते. यामुळे ग्राहकांना अनोख्या कोडद्वारे सेवेसाठी गुणांकन देता येते. आमच्या ग्राहकांना अधिक आनंदित करण्यासाठी, गोदरेज अप्लायन्सेसतर्फे दहा वर्षांची कम्प्रेसर वॉरंटी आणि पाच वर्षांची कंडेन्सर वॉरंटी विनामूल्य इन्स्टॉलेशनसह संपूर्ण भारतात दिली जाते. एनएक्सडब्ल्यू एसीची श्रेणी एक टनाच्या कुलिंग क्षमतेसह उपलब्ध होईल आणि त्याची किंमत ५५ ते ६५ हजार रुपये इतकी असेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link