मुंबई : सोशल मीडियावरील स्वीकृती मिळवण्याच्यादृष्टीने ब्रॅंड आयडियाने ‘#MeriRealLife’ ही मोहीम सादर केली असून, या मोहिमेद्वारे लोकांना सोशल मीडियाचा वापर अधिक जबाबदारीने करण्यासाठी आवाहन केले आहे. आयडिया फोर-जीचा वापर करून सोशल मिडियावर आपले खरेखुरे आयुष्य प्रतिबिंबीत करण्याची ‘आयडिया’ या मोहिमेतून लोकांना देण्यात आली आहे.
लोक दररोज सरासरी किमान दोन ते चार तास सोशल मीडियाचा वापर करण्यावर खर्च करतात. इतक्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केल्यामुळे लोकांच्या व्यक्तीगत आयुष्यांवर परिणाम होतो. ‘परफेक्टचे प्रेशर बाजूला करा, आयडिया फोर-जी सोबत आपली रिअल लाइफ दाखवा’ या टॅगलाइनसह ब्रॅंड आयडियाने सोशल मीडियाच्या जबाबदार वापराला प्रोत्साहन देण्यासाठी खास मोहीम आयोजित केली आहे.
या मोहिमेबाबत बोलताना वोडाफोन आयडिया लिमिटेडचे वरिष्ठ विपणन अधिकारी शशी शंकर म्हणाले, ‘लोक आपली प्रत्येक कृती ही सोशल मीडियाला प्रमाण ठेऊन त्यानुसार परफेक्ट वाटावी, अशा दृष्टिकोनातून पाहात असतात. मग ते त्यांचे कपडे असोत, खाण्या-पिण्याच्या सवयी असोत वा सहलींची ठिकाणे असोत. दिवसेंदिवस सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी जगण्याची संकल्पना लोकांमध्ये रुजत चालली आहे. ही परिस्थिती उलट कधीच होत नाही. यामुळे लोक दोन समांतर आयुष्य जगतात. एक म्हणजे सामाजिक आयुष्य आणि दुसरे त्यांचे खरे, वास्तव आयुष्य.’
‘#MeriRealLife या मोहिमेच्या माध्यमातून, लोकांनी त्यांचे खरे, वास्तव आयुष्यच सोशल मीडियावर शेअर करावे आणि कायम परफेक्ट राहाण्याची सवय मोडून काढावी, यासाठी आयडिया प्रयत्न करीत आहे. ‘MeriReallife’ ही केवळ एक मोहीम नव्हे तर, ही एक कल्पना आहे. भारताला सकारात्मक सामाजिक क्रांतीची गरज असल्याने ही कल्पना म्हणजे एक क्रांतीकारी व वेगळी विचारसरणीच ठरणार आहे,’ असे शंकर यांनी सांगितले.