Next
‘सर्जनशील कलेचा आस्वाद घेण्याची संधी गमवू नका’
संचेती हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, January 08, 2019 | 12:31 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘सर्जनशील कलेचा आस्वाद घेण्याची संधी कधीही गमवू नका, कारण ही एक प्रभावी उपचारपद्धती आहे,’ असे मत संचेती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. एच. संचेती यांनी व्यक्त केले.

संचेती हेल्थकेअर अ‍ॅकॅडमीतर्फे ‘क्रिएटिव्ह आर्ट थेरपीज’ या विषयावर पाच व सहा जानेवारी २०१९ दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषद संचेती हॉस्पिटल ऑडिटोरियम येथे आयोजित केली होती. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेची संकल्पना आरोग्यसेवा व क्रिएटिव्ह आर्ट थेरपीज यातील अंतर कमी करणे ही होती. या प्रसंगी संचेती समुहाच्या कार्यकारी संचालिका मनिषा संघवी, डॉ. निकिता मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते.

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ‘क्रिएटिव्ह आर्ट थेरपी असोसिएशन’च्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. या परिषदेत विविध कार्यशाळा होणार असून, यामध्ये डॉ. डॅनियल फ्रँकनेल, रेनेले, केतकी पिंपळखरे, जेफ्री मेहर आणि अनुप्रिया बॅनर्जी यांसारख्या प्रख्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञांचा समावेश आहे. या परिषदेत आरोग्यसेवेत वापरल्या जाणार्‍या नृत्य, नाट्य, कला, म्युझिक थेरपी आणि काही नवीन पद्धतींवर चर्चा झाली.

डॉ. संचेती म्हणाले, ‘सर्जनशील कलेचे दोन भाग असतात. एक म्हणजे त्याची निर्मिती आणि दुसरे म्हणजे कोणीतरी त्याचा आस्वाद घेणे. जो निर्मिती करतो आणि जो आस्वाद घेतो या दोघांनाही सर्जनशील कलेचा लाभ मिळतो. आपण छंद जोपासणे गरजेचे असून, सर्जनशीलतेचे आपले एक वेगळे जग हवे व याचा आस्वाद घेण्याची संधी कधीही गमवू नये.’

संघवी म्हणाल्या, ‘रुग्णांवर उपचार करताना डॉ. के. एच. संचेती यांनी नेहमीच एक समग्र दृष्टीकोन ठेवला आहे. आपल्या रुग्णांना मानसिकरित्या अधिक मजबूत व भावनिकरित्या अधिक स्थिर करण्याची गरज आहे. मानसिक अस्थिरता व निराशा ही कुणालाही येऊ शकते आणि म्हणूनच यावर प्रभावी उपाययोजनेच्या शोधात आम्ही दोन वर्षांपूर्वी संचेती हेल्थकेअर अ‍ॅकॅडमी येथे आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह आर्ट थेरपी अभ्यासक्रम सुरू केला.’

‘डॉ. संचेती यांनी २००१ साली ‘नी क्लबची’ स्थापना केली होती. त्यांचा असा विश्‍वास आहे की, कुठलीही गोष्ट एकत्रित व सामुहिकरित्या केल्यास ती अधिक प्रभावी ठरते. त्यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही ‘क्रिएटिव्ह आर्ट थेरपीज असोसिएशनची स्थापना करीत आहोत,’ असे संघवी यांनी सांगितले.

डॉ. निकीता मित्तल यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या रूपरेषेची माहिती दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link