Next
निसर्गरम्य स्थळी योगानुभूती
प्रेस रिलीज
Monday, December 24, 2018 | 12:33 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पाच हजार वर्षांपूर्वीच्या काळातील उच्च दर्जाची योगानुभूती आजच्या व्यस्त शहरी जीवनात येण्याला मर्यादा पडतात. म्हणून अधून मधून काही दिवस एखाद्या शांत एकांतातील निसर्गरम्य ठिकाणी जाणे आवश्यक आहे. यामुळे नेहमीची सर्व कौटुंबिक-व्यावसायिक व्यवधाने, जबाबदाऱ्या, ताणतणाव, तोचतोचपणा काही काळ तरी विसरायला मदत होते. यातून मिळवलेली शारीरिक-मानसिक ऊर्जा घेऊन, ताजेतवाने होऊन आपण पुन्हा उत्साहाने दैनंदिन रुटीनसाठी सज्ज होतो.

हीच संकल्पना घेऊन ‘योग ऊर्जा’ संस्थेने १८ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये योग रिट्रीटचे आयोजन केले आहे. पानशेतजवळील, सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या एका निवांत रिसॉर्टमध्ये ही रिट्रीट असणार आहे. यात रोज शुद्धी क्रिया, आसन, प्राणायाम, मेडिटेशन असे अनेक योग सेशन्स असतील. या सर्वांचे मार्गदर्शन अनुभवी तज्ज्ञ योग प्रशिक्षकांकडून केले जाईल. योग आणि आयुर्वेद या शास्त्रातील एका नामवंत डॉक्टरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे यांचा समावेशदेखील यात असेल; तसेच योगशास्त्रावर आधारित पुस्तकेही येथे उपलब्ध असतील. उत्तम निवास व्यवस्था, सात्त्विक शाकाहारी आहार यासह सर्व सेशन्स यासाठी अत्यंत वाजवी फी आकारली आहे. 

‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार बुकिंग घेतले जाईल. सुव्यवस्था व उत्तम अनुभव प्रत्येकाला मिळावा यासाठी प्रवेश संख्या मर्यादित आहे. त्यामुळे त्वरित बुकिंग करून येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात तीन दिवस दोन रात्रींच्या या रिट्रीटच्या आनंदात करा’, असे आवाहन योग उर्जाच्या संस्थापक देवयानी यांनी केले.

अधिक माहितीसाठी संपर्क :  ७७९८९ ३०६०८                           
connect@yogaurja.com
www.yogaurja.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search