Next
‘समग्र बाबूजी’ कार्यक्रमाचे आयोजन
BOI
Saturday, February 16, 2019 | 01:38 PM
15 1 0
Share this article:

पुणे : प्रख्यात संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ग्राहकपेठ आणि जनता सहकारी बँक यांच्या वतीने ‘समग्र बाबूजी-सांगीतिक कारकिर्दीचा प्रवास’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, १७ फेब्रुवारी २०१९ रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे संध्याकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. 

यामध्ये हृषीकेश रानडे, जितेंद्र अभ्यंकर, स्वप्नजा लेले आणि स्वरदा गोडबोले बाबूजींची गाणी सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका ग्राहकपेठेत उपलब्ध आहेत. 

कार्यक्रमाविषयी :
‘समग्र बाबूजी- सुधीर फडके यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा प्रवास’
स्थळ : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट 
दिवस व वेळ : रविवार, १७ फेब्रुवारी, संध्याकाळी ६ ते १०. 
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search