Next
‘पॅनासोनिक’तर्फे रेफ्रिजरेटरची नवीन श्रेणी सादर
प्रेस रिलीज
Saturday, February 17, 2018 | 03:30 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पॅनासोनिक इंडियातर्फे एक्सपिरियंस फ्रेश फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटर्सची नवीन श्रेणी सादर करण्यात आली आहे. ही श्रेणी भारतात नव्याने स्थापित करण्यात आलेल्या रेफ्रिजरेटर प्रकल्पामध्ये निर्मित केली जाणार आहे. ही श्रेणी इंटेलिजंट इन्व्हर्टर व इकोनावी तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ज्यामुळे अधिक कुलिंग आणि उच्च उर्जा बचत होणार आहे.

या श्रेणीच्या डिझाईनमध्ये भारतीय ग्राहकांच्या मागणीनुसार सर्वांत मोठा व्हेजिटेबल केस देण्यात आला आहे. या रेफ्रिजरेटरची सुरूवातीची श्रेणी १० मॉडेल्समध्ये उपलब्ध असून याची क्षमता ३३६ लीटर आणि ३०७ लीटर इतकी असेल. याबरोबरच एक्सक्लुझिव्ह दोन वर्षांची एक्सटेंडेड कॉम्प्रेहेंसिव्ह वॉरंटी आणि कॉम्प्रेसरवर १२ वर्षाची वॉरंटी देण्यात येणार आहे. या मॉडेल्सची किंमत ३५ हजार ६५० ते ४२ हजार १५० रुपये या दरम्यान आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search