Next
महिंद्रा ट्रक अँड बस विभागातर्फे `हॅव अ सेफ जर्नी' पुस्तक
प्रेस रिलीज
Tuesday, December 12 | 05:54 PM
15 0 0
Share this story

मुंबई :  महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजन (एटीबीडी)तर्फे लघुकथांद्वारे रस्ता सुरक्षेचे महत्त्व सांगणाऱ्या `हॅव अ सेफ जर्नी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अशाप्रकारचे हे  जगातील पहिले पुस्तक आहे. रस्ते सुरक्षा उपक्रमाचा भाग म्हणून या पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले. २०१६ पासून महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि नॅचरल हॅबिटंट प्रीझर्व्हेशन (एनएचपी) केंद्राद्वारे #हॅव अ सेफ जर्नी (#एचएएसजे) उपक्रम राबवण्यात येत आहे.

लेखक अश्विन सांगी, आनंद नीलकंठन् आणि शिनी अँथोनी यांनी या पुस्तकातील कथा संकलित केल्या असून, अमेरलीसद्वारे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. याशिवाय देशभऱात घेण्यात आलेल्या रस्ते सुरक्षेसंदर्भातील प्रश्नांबाबतच्या कथा लेखन स्पर्धेतील कथांचा यात  समावेश  करण्यात आला आहे. पुस्तकाची प्रस्तावना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लिहिली आहे. याशिवाय महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी विशेष संदेश या पुस्तकात दिला आहे.

ग्लोबल रोड सेफ्टी अहवालानुसार, भारतात, पाच लाख रस्ते अपघातात दर वर्षी १.५  लाख लोक मृत्युमुखी पडतात. याशिवाय यासारख्या अपघातांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांनाही जबर फटता बसतो, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर अनपेक्षितपणे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर घाला पडतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link