Next
‘जेएसडब्ल्यू’तर्फे ट्रक चालकांची आरोग्य तपासणी
BOI
Tuesday, December 04, 2018 | 02:26 PM
15 0 0
Share this story


रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेडतर्फे जिंदालच्या ट्रक पार्किंग विभागातील वाहन चालक व वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी त्यांचे व्यसन समुपदेशन, मौखिक कर्करोग व एचआयव्ही एड्स समुपदेशन करण्यात आले.मौखिक कर्करोगासाठी तपासणीसाठी दंतवैद्य डॉ. विक्रांत कवितके, डॉ. ढेकणे व रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील समुपदेशक डॉ. बबिता शेळके या उपस्थित होत्या. या उपक्रमाचा लाभ १५० वाहन चालकांनी घेतला.

कामानिमित्त कायमस्वरूपी घरापासून व आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वाहन चालक आणि वाहक यांचे स्वतःच्या तब्बेतीकडे दुर्लक्ष होत असते. त्या शिवाय माल भरणे व उतरवणे, रात्रभर वाहन चालविणे यांमुळे वाहन चालकांना ताण येऊन ते अनेक व्यसनांच्या आहारी जातात. ही बाब लक्षात घेऊन जेएसडब्ल्यू पोर्टतर्फे ट्रक चालकांसाठी हे समुपदेशन शिबिर घेण्यात आले.

या शिबिरासाठी जेएसडब्ल्यू युनिट हेड रवी चंदेर, सीएसआर विभागाचे प्रमुख सुधीर तैलंग यांचे मार्गदर्शन, तर क्रेन ऑपरेटर विभागाचे प्रमुख महेश परमार यांचे सहकार्य लाभले. सई साळवी, दर्शना रहाटे यांनी मेहनत घेतली. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link