Next
छगन भुजबळ यांच्यावरील चित्रपटाची घोषणा
प्रेस रिलीज
Tuesday, April 02, 2019 | 12:47 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत माहिती देताना चित्रपटाचे दिग्दर्शक शिवम लोणारी. शेजारी डावीकडून नीरज वळसंगकर, करण जाधव, अर्जुन प्रधान, अथर्व वाघ, प्रसन्न जोगदेव.

पुणे : ‘गुलदस्ता’, ‘चिनू’, ‘बर्नी’ अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या शिवलीला फिल्म्सच्या वतीने ज्येष्ठ नेते गन भुजबळ यांच्यावर जीवनपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. चित्रपटाचा मुहूर्त ११ एप्रिल २०१९ रोजी करण्यात येणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार असून, हा चित्रपट नऊ ऑगस्ट २०१९ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नेते असले, तरी ते माणूस म्हणून कसे आहेत, त्यांनी आपल्या जीवनामध्ये घेतलेले अनेक निर्णय कोणत्या परिस्थितीमध्ये घेतले, त्यांचे परिणाम त्यांच्या आयुष्यावर कशा प्रकारे झाले, अशा अनेक गोष्टींचा मागोवा या चित्रपटाच्या आधारे घेण्यात येणार असल्याची माहिती शिवलीला फिल्म्सचे संचालक व चित्रपटाचे दिग्दर्शक शिवम लोणारी यांनी दिली.

ते म्हणाले, ‘छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनविताना राजकारण हा सर्वांत महत्त्वाचा भाग असला, तरी राजकारण्याच्या पुढेदेखील प्रत्येकाचे वेगळे आयुष्य असते. सामाजिक जीवनामध्ये वावरणारा माणूस हा नेहमीच खासगी जीवनामध्ये अतिशय वेगळा असू शकतो. त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये त्यांनी घेतलेले अनेक निर्णयांचा दूरगामी परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरदेखील मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक आयुष्यातील अनेक पैलू अव्यक्तच राहिले, त्या अव्यक्त पैलूंना घेऊनच या चित्रपटाची निर्मिती आम्ही करत आहोत.’

या चित्रपटात करण जाधव, प्रसन्न जोगदेव, अर्जुन प्रधान आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. चित्रपटाचे छायांकन अथर्व वाघ, तर संकलन नीरज वळसंगकर करणार आहेत. कथा शिवम लोणारी व चिंतन मोकाशी यांच्यासह संवाद लेखन अभिराम भडकमकर करत आहेत. चित्रपटाचे संगीत मानस माळी करणार असून, क्रिएटीव्हज श्रीपाद जाधव करणार आहेत. चित्रपटाचे कला दिग्दर्शन शंतनू कुलकर्णी करणार आहेत, तर ग्राफिक्स व व्हीएफएक्सची जबाबदारी विराज पंध्ये सांभाळणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search