Next
‘कदम यांचे जन्मशताब्दी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करणार’
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची माहिती
प्रेस रिलीज
Tuesday, January 22, 2019 | 03:22 PM
15 0 0
Share this story

‘डीकेटीई’मध्ये माजी खासदार दत्ताजीराव कदम यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली वाहताना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे व इतर.

इचलकरंजी : लोकसभेत इचलकरंजीचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले आणि वस्त्रोद्योगात इचलकरंजीचे देशभरात नेलेले दत्ताजीराव कदम यांच्या विचारांचा व कार्याचा मागोवा घेत वाटचाल सुरू असून, ही वाटचाल अधिक यशस्वी व प्रभावी व्हावी यासाठी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करणार आहे,’ अशी माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली.

दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन (डीकेटीई) सोसायटीतर्फे राजवाड्याच्या दरबारहॉलमध्ये दत्ताजीराव कदम जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी कदम यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘कदमआण्णांनी सामान्य माणसाला आधार दिला. घरहीन व्यक्तींना घरे मिळवून दिली. उद्योगाद्वारे प्रगतशील परिसर व्हावा म्हणून ते झटले. म्हणूनच त्यांच्या स्मृतीसाठी त्यांचे नावे ‘डीकेटीई’ही संस्था काढली असून, ती जगभर विख्यात होत आहे.’

या प्रसंगी ‘डीकेटीई’च्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे, विश्‍वस्त प्रकाश मोरे, सर्जेराव पाटील, सुनील पाटील, अ‍ॅड. स्वानंद कुलकर्णी, शशांक बावचकर, मार्गदर्शक अशोकराव सौंदत्तीकर, संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांच्यासह विविध शाखांचे प्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link