Next
भारतात डिजिटल व्यवहारांबरोबर आर्थिक सायबर गुन्ह्यांत वाढ
प्रेस रिलीज
Friday, April 19, 2019 | 12:43 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : गेल्या वर्षापासून आर्थिक घोटाळ्यांत लक्षणीय वाढले असल्याचे व त्यांचा बळी ठरणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने, म्हणजे ३७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. सर्व वयोगटांतील ग्राहक घोटाळेखोरांच्या जाळ्यात अडकत असून, २७ ते ३७ वर्षे वयोगटांतील व्यक्तींना अन्य वयोगटांच्या तुलनेत आर्थिक घोटाळ्यांचा अधिक फटका बसल्याचा निष्कर्ष ‘एफआयएस’ या वित्तीय सेवा तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपनीने जाहीर केलेल्या नव्या संशोधनात काढण्यात आला आहे.

भारतीयांनी डिजिटल व्यवहार स्वीकारले आहेत; परंतु सोशल इंजिनीअरिंग व फिशिंग ई-मेल मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने, वैयक्तिक माहिती देण्याबाबत काय पथ्ये पाळावीत, हे अद्याप त्यांच्या लक्षात यायचे आहे, असे एफआयएसच्या पाचव्या वार्षिक पेस अहवालात स्पष्ट झाले आहे. भारतात मोबाइल अॅप्स, डिजिटल पेमेंटचा वढता स्वीकार आणि आर्थिक घोटाळ्यांचे वाढते प्रमाण, यांचा कमालीचा सहसंबंध आहे. गेल्या वर्षात आर्थिक घोटाळ्यांचा फटका बसलेले ९६ टक्के भारतीय ग्राहक पेमेंट करण्यासाठी नुकतेच रोख रकमेकडून मोबाइल अॅप व डिजिटल पेमेंटकडे वळले होते. यामुळे देशाच्या आर्थिक एकात्मिकरणाच्या प्रयत्नांवर लक्षणीय परिणाम होत आहे.

‘सध्याच्या डिजिटल बँकिंग क्षेत्रात, बँकांनी सुरक्षा, घोटाळे रोखणे व ग्राहक शिक्षण यासाठी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. यामुळे विश्वासार्हता वाढण्यासाठीही मदत होईल आणि ग्राहक बँकिंग करत असताना यास सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. ग्राहकांनी त्यांच्या बँकेवर ठेवलेला विश्वास केवळ भावना नसून, तो विविध अपेक्षांवर आधारित असणारा निर्णय असतो. परंतु बँकांनी व्यवहार सुरक्षित होण्यावर, घोटाळे रोखण्यावर व वैयक्तिक माहिती गुप्त राखण्यावर भर दिला, तरच त्या ग्राहकांचा विश्वास संपादित करू शकतील,’ असे भारतातील ‘एफआयएस’चे व्यवस्थापकीय संचालक रामस्वामी व्येंकटचलम यांनी सांगितले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search