Next
‘ला ट्रोब’ युनिव्हर्सिटीत प्रवेश घेणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ
प्रेस रिलीज
Monday, May 28 | 06:00 PM
15 0 0
Share this story

ऑस्ट्रेलियातील ‘ला ट्रोब’ विद्यापीठाची माहिती देताना,विभागीय संचालक अमित मल्होत्रा, विद्यापीठाच्या मुख्याध्यापक जेन हॅमिल्टन, प्रा. लीओंग ओंग,  प्रा. डेव्हिड वॉकर

पुणे : ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रख्यात असलेल्या ऑस्ट्रेलियातील ‘ला ट्रोब’ विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत असून, गेल्यावर्षी त्यात आधीच्या वर्षाच्या तुलनेत ३७ टक्के वाढ झाली आहे. हा प्रतिसाद लक्षात घेऊन विद्यापीठाने यंदा काही निवडक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे’, अशी माहिती या विद्यापीठाच्या मुख्याध्यापक आणि ला ट्रोब बिझनेस स्कूलच्या मुख्य प्राध्यापक जेन हॅमिल्टन यांनी दिली. 

‘‘ला ट्रोब’ बिझनेस स्कूलला जगभरात सर्वोत्कृष्ट दर्जा प्राप्त असून, मॅनेजमेंट क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि अत्युकृष्ट दर्जाचे शिक्षण देणाऱ्या या विद्यापीठात प्रवेश घेण्याची जास्तीत जास्त भारतीयांना संधी मिळावी याकरता गेल्या वर्षी पदवी आणि पदव्युत्तर  अभ्यासक्रमासाठी नोव्हेंबरमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. त्याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तिसरे सत्र ही सुरू करण्यात आले आहे. त्याला भारतीय विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली विद्यापीठ, आयआयटी कानपूर आणि पुण्यातील एमआयटी विद्यापीठासोबत या विद्यापीठाने सहकार्य केले असून, त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना ‘ला ट्रोब’ मध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळेल’, असेही जेन हॅमिल्टन यांनी नमूद केले. 

‘या विद्यापीठातर्फे कायम स्वरूपी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे ठरते. यावर्षी १५, २० आणि २५ टक्के अशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधीच्या शैक्षणिक कामगिरीवर आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ही शिष्यवृत्ती देण्यात येईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

‘व्यावसायिक बाजारपेठेची गरज, अपेक्षा यांचा अभ्यास करून येथील अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून, त्यात नवीन विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ‘बिग आयडीयाज इन बिझनेस आणि डिजिटल बिझनेस या दोन नवीन विषयांचा समावेश यंदा करण्यात आला आहे. तसेच नोकरीच्या बाजारपेठेतील जगभरातील नवीन प्रवाहांचा अभ्यास करून त्या सर्व सोयी येथे उपलब्ध केल्या जातात. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये कागदावरील नोकरी अर्ज, व्यक्तीगत माहिती म्हणजेच रेझ्युमे ऐवजी व्हिडिओला प्राधान्य दिले जाते. हे लक्षात घेऊन या विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ रेकॉंर्डींग स्टुडिओ, एडीटींग सुविधा उपलब्ध केली आहे. विद्यार्थ्यांना शेअर बाजारातील व्यवहार थेट बघता याव्यात याकरता विशेष ट्रेडिंग रूमदेखील येथे आहे.अशा नाविन्यपूर्ण सुविधा हे या विद्यापीठाचे वैशिष्ट्य आहे’, असेही हॅमिल्टन यांनी सांगितले.

‘मास्टर इन बिझनेस अॅनालिटीक्स, हा सध्या अत्यंत वेगळा अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक वेतनाच्या नोकऱ्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये मिळाल्या आहेत. यात भारतीय विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय मास्टर ऑफ मॅनेजमेंट, मास्टर इन प्रोफेशनल अकाऊटिंग, मास्टर ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अँड सिस्टीम्स, मास्टर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस या अभ्यासक्रमांचा समावेश आहे’, अशीही माहिती त्यांनी दिली. 

‘पन्नास वर्ष जुन्या आणि नामवंत अशा या विद्यापीठाचे  व्हिक्टोरिया भागात सहा आणि न्यू साउथ वेल्स भागात एक असे सात कॅम्पस असून, आतापर्यंत एक लाख ८१ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी येथून शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. जगभरात या विद्यापीठाचे स्थान तीनशे ऐकावे आहे’, अशी माहिती या वेळी या विद्यापीठाचे भारतातील विभागीय संचालक अमित मल्होत्रा यांनी दिली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link