Next
भिवंडीत मराठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन
मिलिंद जाधव
Thursday, March 07, 2019 | 05:30 PM
15 0 0
Share this story

भिवंडी : ज्ञानमैत्री सामाजिक संस्थेच्या सुबोध चित्र या नाट्य विभागातर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त खुल्या गटात मराठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत प्रवेश विनामूल्य असून, त्यासाठी वयाचे बंधन नाही.

स्पर्धेसाठी ‘रंगभूमी’ हा विषय निवडण्यात आला आहे. कविता २५ मार्च २०१९ रोजी रात्री आठ वाजेपर्यत प्रेम परशुराम जाधव यांच्याकडे पाठवायच्या आहेत. त्यानंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. कविता १० किंवा २० ओळींची असणे अभिप्रेत आहे. स्पर्धेचा निकाल २७ मार्चला जाहीर केला जाईल. प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ असे विजेते काढले जाणारा असून, त्यासाठी सन्मानचिन्ह व रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.

संस्थेचे सचिव प्रेम जाधव हे पिंपळास (ता. भिवंडी) येथे राहत असून, ते एक रंगभूमी कलाकार आहेत. त्यांनी अनेक एकांकिका व नाटके लिहिली आहेत; तसेच त्यांचे सादरीकरणही केले आहे. सध्या त्यांचे ‘नेवाळी २२ जून’ हे रंगभूमीवरील नाटक बहुचर्चित आहे. त्यांचे पुत्र प्रबुद्ध यांचा २७ मार्च रोजी दुसरा वाढदिवस आहे. याचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेत कवींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विकास जाधव यांनी केले आहे.

कविता पाठविण्यासाठी संपर्क : प्रेम जाधव- ९९७५७ ०१२७६
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link