Next
ऐरोलीत पाच जूनला शोभिवंत माशांच्या उबवणी केंद्राचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, June 04, 2019 | 06:12 PM
15 0 0
Share this article:

नवी मुंबई : ऐरोली येथील किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्रात शोभिवंत माशांच्या उबवणी केंद्राचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पाच जून २०१९रोजी दुपारी १२ वाजता किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्रात होणार आहे. 

या वेळी खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक, रमेश पाटील, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर जयवंत सुतार, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नितीन काकोडकर, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन.रामबाबू, कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन.वासुदेवन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, राष्ट्रीय मत्स्य आनुवंशिक संसाधन ब्युरो लखनऊ डॉ. कुलदीप लाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभाग, कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ‘मरीन मॅटर्स‘ या व्याख्यान मालिकेचे उद्घाटन, महाराष्ट्र वनविकास महामंडळाने कांदळवन प्रतिष्ठानला दिलेल्या ३६ सीटर बसचा लोकार्पण सोहळा, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांनी तयार केलेल्या बर्ड बँड मोबाइल ॲप्लिकेशनचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते होईल,’ अशी माहिती कांदळवन कक्षाचे उपवनसंरक्षक, संयुक्त संचालकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

कार्यक्रमाविषयी : 
दिवस : पाच जून २०१९
वेळ : दुपारी १२ वाजता 
स्थळ : किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्र, दिवा जेट्टीजवळ, डीएव्ही शाळेसमोर, सेक्टर-१०, ऐरोली, नवी मुंबई.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search